सोलापूर – तालुक्यातील कंदलगाव येथील राऊंड टेबल जीवनज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत विज्ञानाचा कंदील खेडोपाडी घेऊन जाणारी विज्ञानवाहिनी फिरती प्रयोगशाळा पुणे येथील विज्ञान प्रेमी तज्ञांनी प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादरीकरण दाखवीत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी दी. शि. कमळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन विज्ञान वाहिनी प्रयोग शाळा प्रमुख मार्गदर्शक शुभांगी पारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
विनायक दीक्षित, सुरेश येरुणकर, शुभांगी पारकर, हेमा महाजन, कल्पना वर्तक, सतीश गमंडे, आतिक शेख यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रयोगाची माहिती सांगितले तसेच प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल जिज्ञासा निर्माण केले. इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग असून शिकविल्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिले. इयत्ता पाचवी ते सातवी विद्यार्थ्यांना विज्ञानाची माहिती या विषयावर चित्रफीत दाखवण्यात आली. याप्रसंगी सर्व सन्माननीय विज्ञान प्रेमी तथा तज्ञ मार्गदर्शकांचे प्राचार्य आर. बी. यलगोंडे व पर्यवेक्षक एस.बी. जमादार यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : विज्ञान वाहिनी फिरती प्रयोग शाळेचे मार्गदर्शक शुभांगी पारकर,विनायक दीक्षित व विद्यार्थी-विद्यार्थिनी..
Post Views: 23