पिलीव – सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एकदिवसीय संप पुकारला आहे.टी ईटी परीक्षा रद्द करावी, बिएलओ, एस आय आरची कामे शिक्षकांना देऊ नयेत 14 मे 2026 चे पञ रद्द करावे ,जाचक संच मान्यता रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी एकदिवसीय शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.

यामध्ये पिलीव केंद्रातील 17 पैकी 14 शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेतला तर.यातील कुसमोड येथील जिल्ह्य परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर, झिंजेवस्ती आंबेडकरवस्ती येथील तसेच सुळेवाडी येथील जिल्ह्य परिषद प्राथमिक शाळा या तिन शाळा माञ नियमितपणे सुरू होत्या. पिलीव केंद्रातील अनेक शिक्षक सोलापूर येथील मोर्चात सहभागी झाले होते. चौकट _ या एकदिवसीय संपाबाबत प्राथमिक शिक्षक सचिन गाटे सर यांना विचारले असता शासनाने शिक्षकांना शाळा बाहय कामे दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तसेच शिक्षकांच्या इतर मागण्या सरकार मान्य करीत नाही यामुळेच शिक्षकांना शासनाला जागे करणयासाठी संप करावा लागला





















