Friday, July 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतमालाची नासाडी टाळून उत्पन्न वाढवण्यासाठी बार्शीत सुगी पश्चात

तरुण भारतbyतरुण भारत
July 9, 2026
in west maharashtra
0
शेतमालाची नासाडी टाळून उत्पन्न वाढवण्यासाठी बार्शीत सुगी पश्चात
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, काढणी पश्चात होणारी नासाडी कमी व्हावी आणि मूल्यवर्धनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, या उद्देशाने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार समिती कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यशाळेचे उद्घाटन बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकेत NIPHT तळेगाव दाभाडेचे व्यवस्थापक श्री. रमेश घुले यांनी संस्थेच्या गेल्या २० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. भारतात दरवर्षी सुमारे ४०% फळे, भाजीपाला आणि अन्नधान्याची काढणी पश्चात नासाडी होते. ही नासाडी टाळून शेतमालावर प्रक्रिया करुन त्याला अधिक भाव मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे, असे ते म्हणाले.
     तज्ञांचे मार्गदर्शन
डॉ. भिसे सर, विषय तज्ञ, फलोत्पादन, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर यांनी “द्राक्ष व आंबा उत्पादन तंत्रज्ञान” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “द्राक्षात घडाची प्रतवारी, बंच थिनिंग आणि गॅप फीलिंग यामुळे दर्जा सुधारतो. आंब्यात नियमित छाटणी, फळमाशी सापळे आणि बागेत स्वच्छता ठेवल्यास उत्पादनात २५% वाढ होते. काढणीनंतर ४ तासांच्या आत माल शीतगृहात नेणे आणि योग्य पॅकिंग केल्यास निर्यातीसाठी माल तयार होतो.
श्री. गणेश पाटील यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान व कृषी विभागाच्या योजना यावर माहिती दिली. ते म्हणाले, सोयाबीनसाठी जूनच्या पहिल्या १५ दिवसात पेरणी, प्रति एकर ३० किलो बियाणे आणि बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. तणनियंत्रणासाठी पेरणीनंतर २० दिवसांनी एक खुरपणी करावी. शेतकऱ्यांनी पी.एम. किसान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, अनुदानावर ठिबक सिंचन आणि पीक विमा योजनांचा लाभ घ्यावा.
श्रीमती ओसवाल, फळ व भाजीपाला प्रक्रिया तज्ञ, पुणे यांनी फळे आणि भाजीपाल्याची प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, द्राक्षापासून मनुका, आंब्यापासून पल्प आणि सोयाबीनपासून दुध, पनीर तयार करता येते. यासाठी कमी गुंतवणुकीत घरोघरी प्रक्रिया युनिट सुरू करता येतात. योग्य पॅकेजिंग आणि ब्रँडिंगमुळे स्थानिक बाजाराबरोबरच ऑनलाईन विक्रीलाही वाव मिळतो.
श्री. संतोष डोईफोडे, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे म्हणाले, शेतकऱ्यांनी आता केवळ उत्पादनावर भर न देता काढणी पश्चात व्यवस्थापन आणि मूल्यवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ब्रोकोली, झुकीनी, लेट्यूस, चेरी टोमॅटो यांसारख्या परदेशी भाज्यांना शहरी बाजारात आणि हॉटेल्समध्ये मोठी मागणी आहे. या पिकांमधून कमी क्षेत्रात आणि कमी पाण्यात जास्त नफा मिळू शकतो. NIPHT तळेगाव दाभाडे मार्फत आम्ही शेतकऱ्यांना परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग आणि FSSAI परवाना यावर प्रशिक्षण देतो. तसेच प्रक्रिया युनिटसाठी प्रकल्प अहवाल आणि बँक कर्जासाठी तांत्रिक मदतही केली जाते. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या शेतमालाला अधिक भाव मिळवून द्यावा.
श्री. यतिन गुंडेकर यांनी संस्थेच्या प्रयोगशाळा, प्रशिक्षण सुविधा आणि उद्योजकता विकास कार्यक्रमांची माहिती दिली.
सभापती विजय गरड यांनी सांगितले की,शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि काढणीनंतर होणारी नासाडी थांबावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी नेहमीच प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने आयोजित केलेली ही प्रशिक्षण कार्यशाळा त्याच दृष्टीकोनातून घेण्यात आली. शेतकऱ्यांनी येथे दिलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून उत्पादनासोबतच साठवणूक, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाकडे लक्ष द्यावे. बाजार समितीच्या वतीने अशा तांत्रिक प्रशिक्षणांचे आयोजन भविष्यातही सुरू राहील आणि शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल..
सचिव तुकाराम जगदाळे यांनी सांगितले की,बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन वाढवण्यावरच नव्हे तर काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि योग्य पॅकेजिंगवरही भर द्यावा. त्यामुळे शेतमालाला अधिक भाव मिळेल आणि नासाडी टाळता येईल. बाजार समितीच्या वतीने आम्ही अशा उपयुक्त प्रशिक्षणांचे आयोजन पुढेही करत राहू आणि शेतकऱ्यांना तांत्रिक तसेच बाजारपेठेच्या दृष्टीने सर्वतोपरी सहकार्य करु..
कार्यशाळेनंतर उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाबद्दल समाधान आणि आभार व्यक्त केले. द्राक्ष, आंबा आणि सोयाबीनच्या आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाबरोबरच काढणी पश्चात साठवणूक आणि प्रक्रिया उद्योगाची माहिती शेतकऱ्यांना नवीन वाटली. परदेशी भाजीपाला लागवडीमुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळू शकते हे ऐकून अनेक शेतकऱ्यांनी अशा पिकांची लागवड करण्यास स्वारस्य दाखवले. तसेच शेतमालावर प्रक्रिया करून त्याला अधिक भाव मिळवून देता येईल याबत शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता दिसून आली. अशा प्रकारच्या तांत्रिक मार्गदर्शनपर कार्यशाळा भविष्यातही नियमितपणे घेण्यात याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
यावेळी बाजार समितीचे संचालक रामेश्वर पाटील, प्रविण गायकवाड, भरतेश गांधी, गजेंद्र मुकटे, सुरेश गुंड, प्रभाकर डमरे, यशवंत माने, अभिजीत कापसे, रविकांत साळुंखे, संजयकुमार माळी, नेताजी घायतिडक, अजित बारंगुळे, सतीश हनुमंते, सचिन बुरगुटे, सौ. मनिषा ताकभाते, सुमन पाटील आणि सचिव तुकाराम जगदाळे उपस्थित होते. बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Post Views: 12
Previous Post

बिटूचा प्रश्न मार्गी लावल्यावर देवेंद्र कोठेनी आजोबांच्या नावे केली भावनिक पोस्ट #viral #aajsolapur

Next Post

आषाढीवारी व सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आषाढीवारी व सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई

आषाढीवारी व सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई

ताज्या बातम्या

उड्डाणपूलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या जागा त्वरित घ्या -प्रविणसिंह परदेशी #viral #solapurnews

July 9, 2026

बी 2 सत्ता प्रकार पाठपुरावा यशाचा आनंद साजरा करतानाचे क्षण…. #viral #marathinews #solapurnews

July 9, 2026
श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग

श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग

July 9, 2026
माळशिरस बस स्थानकात मॉब ड्रिल ची रंगीत तालीम

माळशिरस बस स्थानकात मॉब ड्रिल ची रंगीत तालीम

July 9, 2026
सोलापूरच्या १३७८ कोटींच्या पाणी योजनेला गती; २० जुलैपूर्वी अंतिम टीपीआर सादर करा : परदेशी

सोलापूरच्या १३७८ कोटींच्या पाणी योजनेला गती; २० जुलैपूर्वी अंतिम टीपीआर सादर करा : परदेशी

July 9, 2026
भीमा खोऱ्यातील पावसाची उघडीप; सर्व धरणांतील विसर्ग बंद

भीमा खोऱ्यातील पावसाची उघडीप; सर्व धरणांतील विसर्ग बंद

July 9, 2026
उघड्या ११ केव्ही वीज वाहिनीचा शॉक, सुदैवाने जीव वाचला, पण गंभीर जखमी

उघड्या ११ केव्ही वीज वाहिनीचा शॉक, सुदैवाने जीव वाचला, पण गंभीर जखमी

July 9, 2026
महिला आरोग्य समित्या म्हणजे समाजाच्या निरोगी भविष्यासाठी सक्षम यंत्रणा : न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

महिला आरोग्य समित्या म्हणजे समाजाच्या निरोगी भविष्यासाठी सक्षम यंत्रणा : न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

July 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0967141

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!