Tuesday, August 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

 शिक्षणमहर्षींचा वारसा जपत खेडगी परिवाराचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

तरुण भारतbyतरुण भारत
July 10, 2026
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट – शिक्षणमहर्षी व दानशूर स्व. चनबसप्पा खेडगी यांनी रुजविलेल्या शिक्षणसेवेच्या वटवृक्षाला दिवंगत चेअरमन स्व. शिवशरण खेडगी यांनी सर्वसामान्य व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत अधिक विस्तार दिला. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी सीमावर्ती भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. आज खेडगी परिवार त्यांचा हा वारसा तितक्याच निष्ठेने पुढे नेत आहे ., त्यांचे कार्य समाज व भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी काढले.
शुक्रवारी दुपारी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन स्व. शिवशरण खेडगी यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त चेअरमन बसलिंगप्पा खेडगी मित्र परिवाराच्या वतीने सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात आयोजित ‘शिव-शरण अक्कलकोट भूषण’ सन्मान सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी होत्या. व्यासपीठावर श्री बसवलिंग महास्वामीजी,
श्री अभिनव शिवलिंग महास्वामीजी (मादनहिप्परगा), श्री शिवबसव राजेंद्र महास्वामीजी (खेडगी), श्री अभिनव बसवलिंग महास्वामीजी (नागणसूर), श्री प्रभूशांतलिंगेश्वर महास्वामीजी (हत्तीकणबस), संस्थेचे उपाध्यक्षा भारतीताई खेडगी, चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणे, व्हाइस चेअरमन अशोक हारकूड, संचालक अॅड. अनिल मंगरुळे, चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी, पवित्रा खेडगी, ज्योती धरणे व चन्नवीर खेडगी उपस्थित होते.
प्रारंभी स्व. शिवशरण खेडगी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात उपप्राचार्या वैदेही वैद्य यांनी स्व. शिवशरण खेडगी यांच्या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्याचा आढावा घेतला.
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी पुढे म्हणाले की, सन १९६९ मध्ये सीमावर्ती भागात खेडगी परिवाराने सुरू केलेल्या शैक्षणिक चळवळीने आज भव्य स्वरूप धारण केले आहे. विद्यमान चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने प्रगतीची नवी शिखरे गाठली असून, आज खेडगी शिक्षण संकुलाचे विस्तीर्ण कॅम्पस एका विद्यापीठाची अनुभूती देणारे आहे. स्व. चनबसप्पा खेडगी आणि स्व. शिवशरण खेडगी यांनी केलेले कार्य हे ‘मरावे परी कीर्तिरूपी उरावे’ या उक्तीला सार्थ ठरविणारे असून, त्यांच्या विचारांचा आणि सेवाभावाचा वारसा आजही समाजाला दिशा देत आहे.
या सोहळ्यास तहसीलदार विनायक मगर, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक अविनाश पवार, नगरसेवक अविनाश मडिखांबे, प्रमोद कोरे, अप्पासाहेब पाटील, बसवराज माशाळे, मल्लिनाथ स्वामी, जितेश यारोळे, धुळप्पा भजे, रेवणसिद्ध मंगरुळे, माजी प्राचार्य गुरुशांत हारकूड, एम. ए. शेख, डॉ. किसन झिपरे, आनंद खजुरगीकर, शशिकांत बकरे, सुधीर माळशेट्टी, मल्लेशप्पा गोरे, सुरेश उंबराणीकर, चिदानंद कुंभार, चंद्रकांत पडणूरे, विक्रांत अळ्ळोळी, नागेश कोनापूरे, कालिदास कोळी, कल्याणी खेडगी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लता हिंडोळे, प्रा. वर्षाराणी हत्ताळी आणि प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले. प्रभारी प्राचार्य डॉ. अंकुश शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
चौकट —
*यांचा झाला सन्मान*
खेडगी परिवाराने आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्यात  डॉ. योगेश वेळापूरकर (आरोग्य), डॉ. शिवराया अडवीतोट व एम. बी. पाटील (शिक्षण), संतोष बिराजदार (प्रशासकीय), सुरेश डिग्गे (समाजकारण), मेजर अनिल हत्ते (संरक्षण), वनिता तंबाके (बचत गट), विद्याधर गुरव (उद्योग व्यवसाय), शशिकांत हत्तुरे (कृषी), शशिकांत स्वामी (बँकिंग), अश्पाक मोमीन (पोलीस), भीमाशंकर कुंभार (उद्योजक) आणि खेडगी महाविद्यालयातील प्रा. जयश्री बिराजदार, प्रा. नीलप्पा भरमशेट्टी, प्रशासकीय सुहास होटकर, शिक्षकेतर कर्मचारी बाबूराव बोलदे या आदर्श व्यक्तींचा व दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर व पोलिस, आर्मी भरती झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह, शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
Post Views: 44
Previous Post

बुधवार पेठ येथे दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ नाम साधना वर्गाचे शुभारंभ

Next Post

तीन जिल्हाला वरदानीय ठरलेले उजनी धरण अखेर पन्नास टक्क्यांकडे वाटचाल शेतकऱ्यांनच्या आशा पल्लवित

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
तीन जिल्हाला वरदानीय ठरलेले उजनी धरण अखेर पन्नास टक्क्यांकडे वाटचाल शेतकऱ्यांनच्या आशा पल्लवित

तीन जिल्हाला वरदानीय ठरलेले उजनी धरण अखेर पन्नास टक्क्यांकडे वाटचाल शेतकऱ्यांनच्या आशा पल्लवित

ताज्या बातम्या

पहा काय म्हणाल्या खासदार- डॉ .ज्योती वाघमारे#news #marathinews #solapurnews #solapur

August 24, 2026

कर्तृत्वाचा सन्मान, प्रेरणेचा जागर अनुभव प्रतिष्ठानच्या ‘अनुभव रत्न’ पुरस्कारांचे वितरण

August 24, 2026

जरांगेबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले #viral #marathinews#news

August 24, 2026

स्त्रीची शक्ती हत्तीची इतिहास साक्षी आहे – सुधा मूर्ती #viral #maharashtranews #marathinews

August 24, 2026

विडी कामगार एल्गार ; उद्योग बंद करणारे धोरण रद्द कराची मागणी

August 24, 2026

महापौरांनी घेतली श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनाची बैठक #solapurnews#news #viral

August 24, 2026

संभाजीनगरच्या त्या घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितले हे #viral #maharashtranews #marathinews

August 24, 2026

काजू चेरीच्या हिंडोल्याने भक्तांना दिला नेत्रानंद #solapurnews#news

August 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1114111

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!