टेंभुर्णी – पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडझाप होत असल्याने उजनी धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकात कमी होत चालला आहे. त्यामुळे भीमा नदीवरील बहुतांश धरणांमधून सुरू असलेले विसर्ग कमी जास्त करण्यात होत आहे आज दौंड येथून उजनी धरणाकडे सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही गेल्या दोन दिवसांपेक्षा आज जास्त घट झाली आहे . प्रत्येक तासाला विसर्ग कमी होत असल्याने नदीपात्रातील पाण्याचा प्रवाहही मंदावला आहे.
गुरुवारी दि 9 जुलै सायंकाळी 7 वाजेपर्यंत दौंड येथून उजनी धरणात 53 हजार 53,717 क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू होता. तर आज शुक्रवारी सायंकाळी 14 हजार 14062 ईतका येत आहे पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम राहिल्यास या विसर्गात आणखी घट होण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उजनी धरणातील पाणीसाठ्यात मात्र समाधानख वाढ सुरू असून धरणाची पातळी हळूहळू वाढत आहे. शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत उजनी धरणातील एकूण पाणीसाठा 88.23 टीएमसी इतका झाला असून उपयुक्त पाणीसाठा 20.57 टीएमसी झाला आहे. धरण भरावाची टक्केवारी 45.87% टक्क्यांवर पोहोचली आहे. उद्या सकाळी 50% साठा होत असल्याचा पाटबंधारे विभागातून मत व्यक्त केले आहे
भीमा खोऱ्यात पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्यास उजनी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन धरणाची वाटचाल पन्नास टक्क्यांच्या पुढे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मात्र पावसाची पुणे जिल्ह्यातील काही भागात उघडझाप होत आहे त्यामुळे वरून उजनी धरणात येणारा विसर्ग जलसाठ्यात वाढीचा वेग मंदावला आहे, आगामी पावसावरच उजनीच्या पुढील भरावाची दिशा अवलंबून राहणार आहे. मात्र उजनी धरणावर अवलंबून असलेले शेतकरी उजनी धरण 50 टक्के होत असल्याने अनेक शेतकरी ऊस लागवड करण्यासाठी धावपळ करू लागले आहेत मात्र उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा अजूनही पाटबंधारे विभागाचा व राजकीय नेते मंडळींनी कुठली हालचाल न केल्याने शेतकऱ्यांचे याकडे लक्ष वेधले आहे
######################
#उजनी धरणाची पाणीस्थिती#
दि. 10 जुलै 2026, सायंकाळी 7:00 वा.
धरणातील पाणीपातळी (RWL) : 494.080 मीटर
जलसाठ्याचे क्षेत्रफळ : 263.20 चौ. कि.मी.
एकूण पाणीसाठा (Gross Storage) : 2,498.73 दशलक्ष घनमीटर (MCum)
= 88.23 टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा (Live Storage) : 695.92 दशलक्ष घनमीटर (MCum)
= 24.57 टीएमसी
उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी : 45.87%
धरणातील पाण्याची आवक (Inflow):
दौंड नदी मापन केंद्रावरील नदीची पाणीपातळी : 499.110 मीटर
पुणे जिल्ह्यातून दौंड येथून उजनी धरणात येणारी पाण्याची आवक : 14,062 क्यूसेक
Post Views: 7