
मंगळवेढा तालुक्यातील सर्व जि.प.शाळामधील शिक्षक एक दिवशीय शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाले. शासनाने वेतन कपातीचा इशारा दिला होता. मात्र तो जुगारुन एकजुटीने शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सेवेमध्ये कार्यरत शिक्षकांना टीईटी सक्तीचा पुनर्विचार करण्यात यावा,सेवेतील शिक्षकांचा शैक्षणिक अनुभव,कौशल्य,शैक्षणीक तंत्रे इत्यादी पहिेले ते आठवीचा अभ्यासक्रम या बाबी विचारात घेतल्या जाव्यात. नवीन शैक्षणिक वर्षाच्या आरंभी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून बी.एल.ओ. म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करुन एस.आय.आर. मोहिमे साठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी,पदोन्नती प्रक्रिया राबविताना सेवा जेष्ठ शिक्षकावर होणारा अन्याय दूर करावा, यासाठी दि.14 मे 2026 रोजी शिक्षण संचालक पुणे यांनी निर्गत केलेले पत्र अधिक क्रमीत करण्यात यावे,सर्व राज्य सरकारी कर्मचार्यांना सरसकट मुळची जुनी पेन्शन योजना लागू करावी,दि.15 मार्च 2024 रोजी काढण्यात आलेला संच मान्यता आदेश रद्द करावा,विशेष शिक्षक पद मंजूरीसाठी वरिष्ठ प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळासाठी करण्यात आलेला भेदभाव दूर करावा आदी मागण्या शिक्षकांच्या होत्या. या मोर्चा मध्ये जिल्हा शिक्षक नेते सुरेश पवार,विठ्ठल ताटे,सिध्देश्वर सावंत,संजय दवले, भाऊसाहेब माने,आप्पाराव न्यामगोंडे,बंडू पाटील,राजेंद्र कांबळे, नवनाथ सपताळे,रविंद्र लोकरे आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.


















