जूनच्या पहिल्या आठवड्यात चालू होणारा पावसाळा सिझन निम्मा जुलै महिना संपला तरी या परिसरात कसलाच पाऊस पडला नाही त्यामुळे हाता तोंडाशी आलेली ऊस व केळी पिके पावसा अभावी वाळून जाण्याची स्थिती उद्भवली आहे .
गतवर्षाचा विचार करता शासनाने उजनी व वीर धरणाचे पाण्याचे उत्तम नियोजन करत ऐन उन्ह्याळ्यात मार्च ‘एप्रील व मे च्या मध्यापर्यंत कॅनॉल मधून पाणी सोडले होते . कॅनॉलचे पाणी बंद झाल्या बरोबर मे महिन्यात सुमारे ५ इंच ( १२५ ) मी . मी . पाऊस या परिसरात पडल्याने पिके तरली गेली व ओढ्या नाल्यांना पूर आला तसेच विहीरी व बोअरच्या पाण्याची पातळी चांगली वाढली त्या नंतरही समाधानकारक पाऊस पडल्याने विशेषत: ऊस व केळी ह्या बागायती पिकांना चांगला लाभ झाला .

यावेळीही शासनाने मागचेच धोरण राबवित मार्च,एप्रील, व मे महिन्या पर्यंत उजनी कॅनॉलला पाणी सोडले तर वीरधरणातून नियमा प्रमाणे पाण्याची आवर्तने सोडली .
यावेळी उन्हाचा तडाकाही जास्त होता त्यामुळे मे मध्ये अपेक्षित नसलेला पाऊस जून मध्ये हमखास पडेल अशी शेतकरी वर्गास आशा होती परंतू जलै महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने विहीरीच्या व बो बाअरच्या पाण्याची पातळी खालावली असल्याने शेतकरी व सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे .
खरे तर पावसाची आत्ता गरज आहे नाही तर रानात उभा असलेला ऊस एकतर जनावरांच्या छावण्या साठी नाहीतर पाण्या अभावी जळून जाण्याची शक्यता आहे . याचा फटका जसा शेतकरी वर्गास बसणार आहे तसा कारखान्यासही बसणार आहे . स्पर्धेच्या युगात एकतर सर्वच काररवान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे अशा परिस्थितीत पूर्ण क्षमतेने कारखाने चालविणे तारेवरची कसरत ठरणार आहे . तर कमी कालावधी कारखाने चालल्या मुळे रोजगाराचा प्रश्न आ वासून पुढे उभारणार आहे .
*शेतकर्यां पुढे दुहेरी संकट* यावेळी पावसाने ओढ दिल्याने रानातील पिके कशी वाचवायची ही विवंचना आहे . तर मागील एक ते दीड महिन्या पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा व ऊस पिके उद्धस्त झाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले . व आता कसलाच पाऊस नसल्याने धोका निर्माण झाला आहे . एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चाक नैसर्गिक आपत्ती मुळे रुतल्याने आर्थिक गती मंदावले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे .


















