बार्शी – वैराग पोलीस स्टेशन अंतर्गत भारतीय दंडविधान संहिताचे कलम ३५३, ३७९,५०४,३४ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सदर आरोपी हे मौजे मुंगशी (वा) ता. बार्शी येथील नदीच्या पात्रातील होणाऱ्या अनधिकृत वाळू /गौण खनिज उपसा करुन चोरी करत असताना मंडल अधिकारी तसेच अव्वल कारकुन तहसील यांनी नदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या जयसिंह हरीदास क्षीरसागर व दत्तात्रय हरीदास क्षीरसागर यांना अडवुन वाळू उत्खन्न परवानाबाबत विचारपुस केली असता परवाना नसलेचे सांगून त्यांनी अरेरावीची भाषा केली व सदर आरोपी यांना ट्रॅक्टर व ट्रॉली पोलीस स्टेशनला घेवून चला असे सांगितले असता आरोपीने मुद्दाम ट्रॅक्टर बिघडवून सरकारी कर्मचारी यांना अरेरावीची भाषा वापरुन धमकावले व वाळू चोरुन नेल्यामुळे आरोपी विरुद्ध वैराग पोलीस स्टेशन येथे गु र. नं १८८/२०१५ अन्वये भादंवि कलम ३७९, ३५३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणाची सुनावणी बार्शी येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे समोर झाली. सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे तपासलेले साक्षीदार यांचा पुरावा आरोपींना शिक्षा देण्यासाठी पुरेसा नाही व आरोपीविरुद्ध सबळ पुराव्याच्या अभाव असल्याबाबत युक्तिवाद ॲड. एस.एम. गुंड यांनी केला.
सदर प्रकरणातील आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन सदर आरोपी जयसिंह क्षीरसागर व दत्तात्रय क्षीरसागर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. साक्षीदार व अनेक बाबींची पडताळणी करुन न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
सदर प्रकरणी यात आरोपीच्यावतीने ॲड. एस एम गुंड व ॲड. व्ही.पी जाधव, ॲड. आर आर घोडके, ॲड. ए. एस.गुंड, ॲड. आर के ननवरे, ॲड. सौरभ विधाते यांनी काम पाहिले.
Post Views: 19