बार्शी – आमदार राजाभाऊ राऊत यांनी सिंचन भवन पुणे येथे जलसंपदा विभाग (महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ) कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत धुमाळ यांची भेट घेऊन बार्शी उपसा सिंचन टप्पा ३ याविषयी विस्तृत चर्चा केली. बार्शी उपसा सिंचन टप्पा ३ चा पूर्वआराखडा तयार करण्यासंबंधी चर्चा झाली.
मंगळवार दि. १४ जुलै रोजी मंत्रालयात बार्शी उपसा सिंचन योजना टप्पा ३ विषयी चर्चा करण्यासाठी बैठक होणार असून लवकरच योजना अंमलात येणार आहे.
यावेळी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना बार्शी उपसा सिंचन योजनेला पाणी सोडण्याची आग्रही मागणी आमदार राजाभाऊ यांनी डॉ. धुमाळ यांच्याकडे केली. मंगळवारी मंत्रालयात बैठकीत चर्चा होणार असून लवकरच बार्शी तालुक्यातील शेतकर्यांना बार्शी उपसा सिंचन योजनेला पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.
Post Views: 16