अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून होत असलेल्या चौफेर विकास कामामुळे अक्कलकोट तीर्थ क्षेत्र विकासला चालना मिळत असल्याचे मनोगत राज्याचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांनी व्यक्त केले.*
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती व शिव छत्रपती शिवाजी महराजांची रेखीव प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या समवेत खा.ज्योतीताई वाघमारे, माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेना सो.म.पा. नगरसेवक अमोल बापू शिंदे, प्रियदर्शन साठे, शिवसेनेचे महेश साठे, संजय पाटील, मनीष काळजे हे उपस्थित होते.
याप्रसंगी न्यासचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, पुरोहित सोमकांत कुलकर्णी, निखील पाटील, प्रवीण घाटगे, बाळासाहेब पोळ, दत्ता मोरे, दत्ता माने, शुभम सावंत, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Post Views: 29