सोलापूर – आजच्या आधुनिक युगात क्रीडा, फिटनेस आणि आरोग्य क्षेत्राला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहरूनगर येथील ‘श्री सुशीलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन & स्पोर्ट्स’ मध्ये प्रवेशाची उत्तम संधी उपलब्ध आहे.
महाविद्यालयात बारावीनंतर तीन वर्षांचा बी.पी.ई.एस. हा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असून, याद्वारे स्पर्धा परीक्षांसह ‘एनआयएस’ कोच डिप्लोमाचे मार्ग खुले होतात. यानंतर बी.पी.एड. हा व्यावसायिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून शाळा व महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून नोकरी मिळवता येते.
तसेच उच्च शिक्षणासाठी दोन वर्षांचा एम.पी.ई.एस. हा पदव्युत्तर अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. प्रशिक्षित क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व क्रीडा प्रशासक बनण्यासाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. अधिक माहिती व प्रवेशासाठी ९६२३०००७६८ या क्रमांकावर संपर्क साधावा.























