सांगोला – सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायिनी असणाऱ्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण झाले. योजनेसाठी निधीही मंजूर झाला. परंतु गेल्या काही दिवसांपासून या योजनेचे काम संथ गतीने सुरू होते. याबाबत लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपली व्यथा माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कडे मांडली होती.
या पार्श्वभूमीवर त्यांनी वायफळ ता.जत येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यापासून ते नराळे, हबीसेवाडी, यमगरवाडी, मानेवाडी, घेरडी तसेच वाकी घे, वाणिचिंचाळे, जवळा, आगलावेवाडी, तरंगेवाडी आलेगाव, मेडशिंगी या परिसरात सुरू असणाऱ्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांना लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी घेरडीचे माजी सरपंच दिलीप मोटे, भाऊसाहेब यमगर, चंद्रकांत कारंडे, मधुकर करतडे, नामदेव साळुंखे, संजय गायकवाड, सुरेश गावडे, सुखदेव गावडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार तसेच लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामे पूर्ण झाल्यानंतर लगेचच या योजनेतून बंद पाईपलाईनच्या सहाय्याने पारे, नराळे हबीसेवाडी, हंगीरगे गावडेवाडी, घेरडी, सोनंद या गावांसह वाकी घे, वाणिचिंचाळे, जवळा, आगलावेवाडी, तरंगेवाडी, भोपसेवाडी, आलेगाव आणि मेडशिंगी या गावांना लवकरच पाणी सोडण्याच्या सूचना दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिल्या. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या परिसरातील शेतकरी सुखावला आहे.