सांगोला – पर्यावरण संवर्धन आणि येत्या पाच वर्षात एक लाख वृक्ष लागवड करून शहर हिरवेगार करण्याचा संकल्प करत सांगोला नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांचा वाढदिवस नगरपरिषदेकडून वृक्षारोपण करून उत्साहात साजरा करण्यात आला.
यामध्ये लिंगायत स्मशानभूमी जुना मेडशिंगी रोड, यल्लमा देवी मंदिर माळवाडी रोड परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, गटनेते प्रशांत धनवजीर, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर तेली, महिला व बालकल्याण सभापती छाया मेटकरी, नगरसेविका आशादेवी यावलकर, नगरसेवक काशिलिंग गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महात्मा बसवेश्वर संघटनेचे रत्नाकर पाटणे, सुमित चांदणे, मनोज उकळे, अमर लोखंडे, निलेश नष्टे, संतोष महिमकर, संदीप चौगुले, काशिनाथ ढोले, प्रसाद जिरगे, अक्षय माहिमकर, वैभव गवळी, नगरपरिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी महेश राजपूत, सिटी कोऑर्डिनेटर अजितकुमार पवार, वृक्ष प्राधिकरण विभागाचे आरिफ मुलाणी उपस्थित होते.
Post Views: 15