Saturday, August 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयाने बांधकाम कामगारांच्या कल्याण योजनांमध्ये मोठे बदल; संघटनांचा तीव्र विरोध

तरुण भारतbyतरुण भारत
July 14, 2026
in maharashtra
0
महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयाने बांधकाम कामगारांच्या कल्याण योजनांमध्ये मोठे बदल; संघटनांचा तीव्र विरोध
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
महाराष्ट्र शासनाने सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सहाय्य योजना आणि निवृत्तीवेतन योजना सुधारित स्वरूपात लागू करण्याचा शासन निर्णय १३ जुलै रोजी जारी केला आहे. या निर्णयानुसार पूर्वीच्या योजना रद्द करून नवीन अटींसह सुधारित योजना लागू करण्यात आल्या आहेत. मात्र, या निर्णयामुळे हजारो बांधकाम कामगार व त्यांच्या पाल्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महासंघाचे संघटन सचिव आनंद भालेराव यांनी केला आहे.आनंद भालेराव यांनी सांगितले की, यापूर्वी नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत २,५०० रुपये, तर आठवी ते दहावीपर्यंत ५,००० रुपये शैक्षणिक सहाय्य मिळत होते.
मात्र, नव्या शासन निर्णयानुसार पहिली ते नववीपर्यंतची शिष्यवृत्ती पूर्णपणे बंद करण्यात आली असून आता केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांनाच या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय, पहिली ते नववीपर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील लाभासाठी अपात्र ठरविण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला.यापूर्वी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळत होते. मात्र, सुधारित योजनेत अकरावीसाठीचे सहाय्य पूर्णपणे बंद करण्यात आले असून केवळ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २५ हजार रुपयांचे सहाय्य ठेवण्यात आले आहे. तसेच दहावी व बारावीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रोत्साहनपर अनुदानही रद्द करण्यात आल्याचा आरोप भालेराव यांनी केला.ते पुढे म्हणाले की, डिप्लोमा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारे २० हजार रुपयांचे सहाय्य तसेच पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षात दिले जाणारे २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्यही सुधारित शासन निर्णयात नमूद नसल्याने या योजनाही बंद झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या कामगारांच्या मुलांवर मोठा परिणाम होणार आहे.निवृत्तीवेतन योजनेतही मोठे बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुधारित योजनेनुसार १० वर्षे नोंदणी असलेल्या कामगारांना ६ हजार रुपये, १५ वर्षे नोंदणी असलेल्यांना ९ हजार रुपये आणि २० वर्षे नोंदणी असलेल्या कामगारांना १२ हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, मंडळाचे अस्तित्वच २० वर्षांपूर्वी नसताना २० वर्षांच्या नोंदणीची अट ठेवणे हे अव्यवहार्य आणि अन्यायकारक असल्याची टीका त्यांनी केली.भालेराव यांनी मंडळाच्या इतर निर्णयांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांना थेट आर्थिक सहाय्य देण्याऐवजी वस्तू स्वरूपात लाभ देण्याचा निर्णय चुकीचा असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रत्यक्ष मदत होणार नाही, असे ते म्हणाले. कामगारांना आवश्यक नसलेल्या काही योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून, ओळखपत्रांचे दरवर्षी नूतनीकरणचे कार्ड, रक्त तपासणी तसेच विविध वस्तूंचे वाटप यामधून कंत्राटदारांना फायदा होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.या सर्व निर्णयांमुळे बांधकाम कामगारांचे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा करत महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महासंघाच्या वतीने लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा आनंद भालेराव यांनी दिला. शासनाने सुधारित निर्णयाचा पुनर्विचार करून पूर्वीच्या शैक्षणिक सहाय्य योजना कायम ठेवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
Post Views: 239
Previous Post

शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्राला 7 खेळांच्या यजमानपदाचा बहुमान

Next Post

पालखी मार्गाची झेडपी अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पालखी मार्गाची झेडपी अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी

ताज्या बातम्या

मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर

August 28, 2026

सोलापूरला ४०० हून अधिक नवे गुरुजी; उर्दू-कन्नड शाळांचे काय?

August 28, 2026

२७६८ शाळांचे होणार ‘फॅसिलिटी ऑडिट’!

August 28, 2026

झेडपी मुख्यालयाचा कारभार पुन्हा बांधकाम ‘एक’कडे

August 28, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 28, 2026
विश्वशांती गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे मूक-बधिर विद्यालयात रक्षाबंधन

विश्वशांती गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे मूक-बधिर विद्यालयात रक्षाबंधन

August 28, 2026
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

August 28, 2026
शिवाजी वसपटे यांना ‘राष्ट्रीय आदर्श क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार प्रदान

शिवाजी वसपटे यांना ‘राष्ट्रीय आदर्श क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार प्रदान

August 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1133479

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!