Friday, September 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरला ४०० हून अधिक नवे गुरुजी; उर्दू-कन्नड शाळांचे काय?

तरुण भारतbyतरुण भारत
August 28, 2026
in solapur
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा अखेर पूर्ण झाला असून, पवित्र पोर्टलद्वारे सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच खासगी प्राथमिक शाळांना मिळून ४०० हून अधिक नव्या शिक्षकांची निवड झाली आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी झालेल्या या निवडीमुळे शिक्षकांच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या अनेक शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, उर्दू आणि कन्नड माध्यमांच्या शाळांमध्ये आवश्यक शिक्षक उपलब्ध झाले आहेत का, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीची निवड यादी गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत विविध व्यवस्थापनांच्या १९ हजार ७५४ पदांपैकी १३ हजार १२९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेसह जिल्हा परिषद अंतर्गत खासगी प्राथमिक शाळा, नगरपालिका, महानगरपालिका आणि अन्य व्यवस्थापनांच्या शाळांसाठी ४०० पेक्षा अधिक शिक्षकांची निवड झाली आहे. यामध्ये पहिली ते पाचवीसाठी शिक्षक तसेच सहावी ते आठवीसाठी पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नियमित आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन मिळण्यास मदत होणार आहे. विशेषतः शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी असलेल्या शाळांना या नियुक्त्यांमुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
चौकट
मात्र उर्दू-कन्नड माध्यमांचा प्रश्न कायम
सर्वसाधारण प्रवाहातील शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर निवड झाली असली तरी उर्दू आणि कन्नड माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांची गरज कितपत पूर्ण झाली, याकडे आता शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. माध्यमनिहाय आणि विषयानुसार शिक्षक उपलब्ध नसतील, तर केवळ एकूण शिक्षकसंख्या वाढल्याने त्या शाळांमधील अध्यापनाची समस्या सुटणार नाही. त्यामुळे निवड झालेल्या शिक्षकांचे माध्यम, विषय, शाळा आणि रिक्त पदांशी जुळणारे नियोजन करून नियुक्ती प्रक्रिया राबविणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट
राज्यात १३ हजारांवर उमेदवारांची शिफारस
राज्यातील विविध व्यवस्थापनांच्या १९ हजार ७५४ उपलब्ध पदांसाठी पवित्र पोर्टलवर प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले होते. त्यापैकी १३ हजार १२९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.यामध्ये पहिली ते पाचवीसाठी ७ हजार ५४१, सहावी ते आठवीसाठी ४ हजार २०७, नववी ते दहावीसाठी १ हजार ११९, तर अकरावी ते बारावीच्या वर्गांसाठी २५२ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
चौकट
रिक्त जागांसाठी ‘कन्व्हर्टेड राउंड’
समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे राज्यातील माजी सैनिक प्रवर्गातील २ हजार ७६० आणि अंशकालीन प्रवर्गातील १ हजार ७६० पदे रिक्त राहिली आहेत. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८०२ आणि पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची १ हजार ४०८ पदे रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी पुढील टप्प्यात ‘कन्व्हर्टेड राउंड’ अर्थात समांतर आरक्षणातील रिक्त जागांचे रूपांतर करून भरती करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात संधी न मिळालेल्या उमेदवारांसाठी पुढील फेरी महत्त्वाची ठरणार आहे.
चौकट
नियुक्त्या आचारसंहितेपूर्वी पूर्ण करण्याची मागणी
“गेल्या वर्षभरापासून राज्यातील हजारो उमेदवार शिक्षक भरतीची प्रतीक्षा करीत होते. अखेर पहिल्या टप्प्यात जवळपास १३ हजार उमेदवारांची निवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही ४०० हून अधिक उमेदवारांची निवड झाली आहे. आता कागदपत्रांची पडताळणी, समुपदेशन आणि शाळा निवडीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी नियुक्त्या द्याव्यात, अशी आमची मागणी आहे. त्यानंतर कन्व्हर्टेड राउंडमधील जागाही रिक्त न ठेवता पुढील महिन्यात भराव्यात. त्यामुळे अधिक उमेदवारांना संधी मिळेल आणि ग्रामीण भागातील शाळांना आवश्यक शिक्षक उपलब्ध होतील,” असे डि.एड.-बी.एड. असोसिएशन/पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी सांगितले.
चौकट
आता प्रशासनासमोर तीन महत्त्वाची कामे
निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, समुपदेशन व शाळा निवड, तातडीने नियुक्ती, या तीन टप्प्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याबरोबरच उर्दू-कन्नडसह प्रत्येक माध्यमातील आणि विषयातील शिक्षकांची वास्तविक गरज तपासून पदस्थापना करणे आवश्यक आहे. अन्यथा एकीकडे शिक्षकांची मोठ्या संख्येने नियुक्ती होऊनही दुसरीकडे काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम राहण्याची शक्यता आहे.
Post Views: 103
Previous Post

२७६८ शाळांचे होणार ‘फॅसिलिटी ऑडिट’!

Next Post

मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मराठी नाट्य परिषदेतर्फे 'नाट्यलेखन प्रोत्साहन योजना' जाहीर

ताज्या बातम्या

ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

September 4, 2026
श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

September 4, 2026

सोलापूरसह राज्यभरात एकांकिका स्पर्धेचे बिगुल

September 4, 2026
बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

September 4, 2026
आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव — डॉ. वीरभद्र दंडे

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

September 4, 2026
महामानव प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात

महामानव प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1162598

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!