Friday, August 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर

तरुण भारतbyतरुण भारत
August 28, 2026
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
     ​सोलापूर – मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या नव्या नाट्यलेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ राबविण्यात येत आहे. बदलते वास्तव, समाज आणि माणसांच्या संघर्षाचे प्रतिबिंब नव्या नाटकांमधून रंगभूमीवर उमटणे ही आजची गरज आहे. नवोदित व प्रतिभावान लेखकांच्या मनात असलेल्या संकल्पनांना रंगमंचापर्यंत नेण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले.
      ​या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीला आशयघन, दर्जेदार व काळाशी संवाद साधणारे नवे साहित्य मिळावे, अशी नाट्य परिषदेची संकल्पना आहे. या योजनेत निवडण्यात आलेल्या पारितोषिक प्राप्त संहिता प्रकाशित करण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे. त्यामुळे सर्व अनुभवी, नवोदित आणि रंगभूमीवर काहीतरी नवे सांगण्याची इच्छा असलेल्या नाट्यलेखकांनी या योजनेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
​या योजनेसाठी पाठवण्यात येणारी नाट्यसंहिता ही मराठी भाषेतील, दोन अंकी आणि पूर्णपणे नव्याने लिहिलेली असणे आवश्यक आहे. सदर संहिता यापूर्वी कोणत्याही नावाने नोंदणीकृत, प्रकाशित अथवा तिचे कोणतेही नाट्यप्रयोग झालेले नसावेत. लेखकांनी आपल्या नाट्यसंहितेच्या दोन टंकलिखित किंवा सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या प्रती २० ऑक्टोबर २०२६ पूर्वी ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई ४०००१६’ या मध्यवर्ती कार्यालयात पाठवायच्या आहेत.
         या योजनेअंतर्गत प्रथम पारितोषिक रु. २१,०००/-, द्वितीय रु. १५,०००/-, तृतीय रु. ११,०००/- आणि उत्तेजनार्थ रु. ३,०००/- देण्यात येणार असून, संगीत नाटकासाठी रु. ११,०००/- चे विशेष पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेचे प्रवेश अर्ज नाट्य परिषदेच्या www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी केले आहे.
Post Views: 20
Previous Post

सोलापूरला ४०० हून अधिक नवे गुरुजी; उर्दू-कन्नड शाळांचे काय?

तरुण भारत

तरुण भारत

ताज्या बातम्या

मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर

August 28, 2026

सोलापूरला ४०० हून अधिक नवे गुरुजी; उर्दू-कन्नड शाळांचे काय?

August 28, 2026

२७६८ शाळांचे होणार ‘फॅसिलिटी ऑडिट’!

August 28, 2026

झेडपी मुख्यालयाचा कारभार पुन्हा बांधकाम ‘एक’कडे

August 28, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 28, 2026
विश्वशांती गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे मूक-बधिर विद्यालयात रक्षाबंधन

विश्वशांती गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे मूक-बधिर विद्यालयात रक्षाबंधन

August 28, 2026
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

August 28, 2026
शिवाजी वसपटे यांना ‘राष्ट्रीय आदर्श क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार प्रदान

शिवाजी वसपटे यांना ‘राष्ट्रीय आदर्श क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार प्रदान

August 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1130244

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!