सोलापूर – सोलापूर रेल्वे विभागाची प्रवाश्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली सोलापूर – पुणे हुतात्मा सुपरफास्ट एक्स्प्रेस दि 15 जुलै 2001 रोजी सुरु होऊन 15 जुलै 2026 रोजी प्रवासी सेवेची 25 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल प्रवासी सेवा संघ यांचेकडून सोलापूर रेल्वे स्टेशनमध्ये मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रवासी संघाच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा एक्सप्रेसच्या प्रवासी डब्यांची अत्यंत सुंदर सजावट केलेली होती.

सोलापूर रेल्वे विभागातील निहारकांती रेल्वे निरीक्षक व साहिल मुलाणी तिकीट निरीक्षक विभाग तसेच स्वच्छता विभागातील कर्मचारी निखील गायकवाड यांचे हस्ते केक कापून मोठ्या उत्साहात रौप्यमोहत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित प्रवाश्यांना व रेल्वे कर्मचारी यांना केक व लाडू वाटप करण्यात आले.
सोलापूर -पुणे – सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस – या रेल्वे सेवेची प्रवाश्यांना सुखकर व वक्तशिर सेवा उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर रेल्वे विभागातील सर्व कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी यांचेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ग्रामिण विभागातील प्रवाश्यांकरीता हुतात्मा एक्स्प्रेसला धाराशिव – तुळजापूर – वैराग -माढा या मार्गावरील प्रवाश्यांकरीता माढा रेल्वे स्टेशनला तसेच करमाळा – परंडा -जामखेड व उजनी धरणात क्षेत्रातील प्रवाश्यांकरीता जेऊर रेल्वे स्टेशन ला जाताना व येताना प्रवासी थांबा मंजुर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तसेच माढा -सोलापूर लोकसभेचे व राज्यसभेचे मान्यवर खासदारांनी रेल्वे बोर्ड / रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली येथे सातत्याने पाठपुरावा करुन माढा वं जेऊर या ग्रामिण विभागातील प्रवाश्यांची गैरसोय दूर करावी असे प्रतिपादन प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले .
यावेळी नंदू दळवी, संजय चौगुले, सिद्राम नुल्ला, निखील दळवी, राजाभाऊ जाधव, गौतम कांबळे, नीता सोनवणे, नागेश पाटोळे, आयुष शिंदे, संकेत चव्हाण, करण शिंदे, अतिश गायकवाड, समीर शेख, रवि कल्लूर, अस्लम शेख, सुनील आडवीतोटे उपस्थित होते.























