जालना – वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश (नीट) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत जालन्यातील आदित्य विलास गावंडे या विद्यार्थ्याने ५६९ गुणांसह ९८.७८ पर्सेंटाइल मिळवत ऐतहासिक यश संपादन केले आहे.

पैठण येथील नगर परिषद कार्यालयात स्वच्छ्ता निरीक्षक पदावर कार्यरत असणारे विलास गावंडे आणि सौ.शालिनी गावंडे यांचे ते चिरंजीव असून जिद्द, चिकाटी, कठीण परिश्रम तसेच गुरुजन आणि आई – वडिलांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आपण हे यश संपादन केले असल्याचे आदित्य याने सांगितले.






















