सांगोला – सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावातून उद्योजक घडावा व गावातील तरूणांना गावातच रोजगार निर्माण व्हावा. त्यासाठी शासनाच्या प्रकिया उद्योग, पर्यटन मंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसी मंडळ, वसंतराव नाईक महामंडळाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकमंगल समुहाचे संस्थापक आ.सुभाषबापू देशमुख यांनी केले. ते लोकमंगल परिवाराच्यावतीने श्रीराम हॉटेल, सांगोला येथे आयोजित उद्योजक सुसंवाद मेळाव्यात बोलत होते.

प्रास्ताविकात लोकमंगल पतसंस्थेचे संचालक ऍड.गजानन भाकरे यांनी लोकमंगल परिवाराच्या वतीने राबविण्यात येणा-या सामुदायीक विवाह सोहळा, निराधारांना मोफत घरपोच डबे, अन्नपुर्णा योजना, समृद्ध गाव योजना, वृक्ष लागवड या उपक्रमांची माहिती दिली. तसेच सीए.मिहीर सोलापूरकर यांनी विश्वमंगल या संस्थेबाबत माहिती दिली. याप्रसंगी चर्चासत्र होऊन उपस्थित उद्योजकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लोकमंगल बँकेचे सांगोला शाखा व्यवस्थापक ऍड.शिवाजी दरेकर यांनी केले. आभार पतसंस्थेचे विभागीय अधिकारी वैभव लांबोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे सुहास वालिकर, विजय स्वामी, ज्योती गुळमिरे, अजय महामुनी, पतसंस्थेचे शाखा अधिकारी दत्तात्रय दिवसे, प्रसाद बुरांडे, ऐश्वर्या दौंडे, साहिल काळे, विद्या राऊत, पृथ्वीराज व्हनमाने यांनी परिश्रम घेतले.
चौकट-
सांगोल्याची जनता प्रामाणिक व कष्टाळू
भविष्यात सांगोला हे रोजगाराचे मॉडेल बनावे यासाठी लोकमंगल बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट सोसायटी उद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्यास सदैव तयार आहेत. सांगोल्याची जनता ही प्रामाणिक असून त्यांच्या कष्टामुळे सांगोल्याचे दुष्काळी पटटा हे नाव पुसले गेले. विश्वमंगल या संस्थेच्या माध्यमातून आपल्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ मिळेल.
-आ.सुभाषबापू देशमुख, संस्थापक, लोकमंगल समूह
Post Views: 5