Friday, July 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्व. गजानन तौर फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरात तब्बल ५०९ जणांचे रक्तदान

तरुण भारतbyतरुण भारत
July 17, 2026
in marathwada
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना – स्व. गजानन तौर यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्व. गजानन तौर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजसेवेचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ५०९ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, गरजू रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध झाला आहे.

 


१७ जुलै रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिराला विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो नागरिकांची उपस्थिती लाभली. यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार हिकमत उढाण, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांच्यासह फाऊंडेशनच्या अध्यक्षा कल्याणी तौर यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून स्व. गजानन तौर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.
यंदा रक्तदानासाठी युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने रक्तसंकलनाची व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली होती. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन करण्यासाठी सहा रक्तपेढ्यांच्या डॉक्टर व वैद्यकीय पथकांनी सहभाग घेतला. यामध्ये श्री स्वामी समर्थ रक्तसंकलन केंद्र, वरद रक्तसंकलन केंद्र (धुळे), जिल्हा सामान्य रुग्णालय जालना, बदनापूर रक्तपेढी, नूर हॉस्पिटल बदनापूर आणि राज्य रक्त संक्रमण केंद्र यांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले.
शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याचा झाड देऊन सन्मान करण्यात आला. युवक, महिला तसेच प्रथमच रक्तदान करणाऱ्या तरुणांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याची भावना व्यक्त करत अनेकांनी नियमित रक्तदानाचा संकल्पही केला.
अभिवादन कार्यक्रमाला नगरसेवक महावीर ढक्का, सभापती संध्या देठे, अक्षय गोरंट्याल, गट नेते महेश निकम,नगरसेवक दिनेश भगत ,सभापती सुजित जोगस, मनोज इंगळे, महेश दुसाने, महेश नळगे यांच्यासह विविध सामाजिक संस्था, व्यापारी, उद्योगपती, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. गजानन तौर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी रक्तदान शिबिरासह आरोग्य, शिक्षण, सामाजिक जनजागृती आणि जनहिताचे विविध उपक्रम राबविले जातात. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत सेवाभावी कार्यातून त्यांची आठवण जिवंत ठेवण्याचा फाऊंडेशनचा प्रयत्न असल्याचे कल्याणी तौर यांनी सांगितले.

आमदार हिकमत उढाण म्हणाले की, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. स्व. गजानन तौर फाऊंडेशनने स्मृतिदिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. ५०९ जणांनी केलेले रक्तदान ही केवळ संख्या नसून समाजातील सेवाभाव आणि मानवतेची जाणीव अधोरेखित करणारी बाब आहे. अशा उपक्रमांमुळे तरुण पिढी सामाजिक कार्याकडे प्रेरित होत आहे.

आमदार नारायण कुचे म्हणाले की, स्व. गजानन तौर यांनी समाजसेवेचा जो विचार जपला, तो फाऊंडेशन आजही तितक्याच ताकदीने पुढे नेत आहे. रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यात शेकडो युवकांचा सहभाग ही आनंदाची बाब आहे. समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. अशा सेवाभावी उपक्रमांना भविष्यातही माझे पूर्ण सहकार्य राहील, असे ते म्हणाले.

Post Views: 5
Previous Post

जालन्यातील आदित्य गावंडेला नीट परीक्षेत ९८.७८ पर्सेंटाइल

Next Post

फाईल गहाळ प्रकरणात तत्कालीन नगरअभियंता सुभाष सावस्कर दोषमुक्त

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

फाईल गहाळ प्रकरणात तत्कालीन नगरअभियंता सुभाष सावस्कर दोषमुक्त

ताज्या बातम्या

१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

July 17, 2026
गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

July 17, 2026
आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

July 17, 2026
आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

July 17, 2026
विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्हीआयपी- पालकमंत्री जयकुमार गोरे

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्हीआयपी- पालकमंत्री जयकुमार गोरे

July 17, 2026
वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य

वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य

July 17, 2026
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ उबाटाची निदर्शने

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ उबाटाची निदर्शने

July 17, 2026

जि.प.बांधकाम विभाग क्र.१ प्रगतीचा आलेख उंचावला

July 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0982177

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!