Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कर्मचारी व स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण; भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर समितीचा पुढाकार

तरुण भारतbyतरुण भारत
July 17, 2026
in west maharashtra
0
कर्मचारी व स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण; भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर समितीचा पुढाकार
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – आषाढी यात्रा कालावधीत राज्यासह देशभरातून लाखो वारकरी व भाविक पंढरपुरात येणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
एस. कार्तीकेयन, जिल्हाधिकारी, सोलापूर तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांच्या आदेशानुसार शुक्रवार, दि.१७जुलै, रोजी सकाळी १० वाजता श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथे मंदिर समितीचे कर्मचारी व स्वयंसेवक यांच्यासाठी दिवसभराचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये कशा प्रकारे तात्काळ प्रतिसाद द्यावा, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये प्रगत दोरीच्या सहाय्याने बचावकार्य, बंदिस्त जागेतील शोध व बचावकार्य, प्रथम प्रतिसादकर्त्याची भूमिका, हृदयक्रिया व श्वसनक्रिया पूर्ववत करण्याचे प्रशिक्षण (सीपीआर), जखमी व्यक्तीला सुरक्षितरीत्या उचलून नेण्याच्या पद्धती, सुरक्षित स्थलांतर, गर्दी व्यवस्थापन, प्राथमिक उपचार, आपत्कालीन बचावकार्य तसेच विविध आपत्तीच्या प्रसंगी समन्वय राखून कार्य करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी संभाजी कारले (अग्निशमन अधिकारी, पंढरपूर), डॉ. अनिल काळे (जिल्हा समन्वयक, १०८ रुग्णवाहिका सेवा, पंढरपूर), रामचंद्र वाघमारे (सचिव तथा प्रशिक्षक, सारथी युथ फाऊंडेशन, सोलापूर), बजरंग होटकर (प्रशिक्षक, इंडियन रेस्क्यू अकादमी, सोलापूर) तसेच साक्षी सर्वगोड (आपदा सखी, सोलापूर) यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी १०८ रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून गर्दीच्या काळात भाविकांना अचानक हृदयविकाराचा झटका, श्वास घेण्यास त्रास होणे, बेशुद्धावस्था किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित मदत कशी करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. हृदयक्रिया व श्वसनक्रिया पूर्ववत करण्यासाठी करण्यात येणारे सीपीआर प्रशिक्षण, रुग्णाची प्राथमिक तपासणी, रुग्णाला सुरक्षितरीत्या हलविण्याच्या पद्धती तसेच रुग्णवाहिका येईपर्यंत आवश्यक प्रथमोपचार कसे द्यावेत, याबाबत डॉ. अनिल काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित कर्मचारी व स्वयंसेवकांनी या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत सराव केला.
प्रशिक्षणा दरम्यान आग लागल्यास करावयाची कार्यवाही, गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या दुर्घटनांचे व्यवस्थापन, बंदिस्त जागेतील बचावकार्य, दोरीच्या सहाय्याने बचावकार्य, आपत्कालीन स्थलांतर, विविध यंत्रणांमधील समन्वय तसेच आपत्तीच्या प्रसंगी शांतपणे व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे महत्त्व याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात मंदिर समितीचे सुमारे २५० कर्मचारी व स्वयंसेवक सहभागी झाले. यात्रेदरम्यान दर्शन रांगा, मंदिर परिसर, भक्तनिवास, अन्नछत्र, दर्शनमंडप, वैद्यकीय मदत केंद्रे तसेच विविध सेवा केंद्रांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असून, भाविकांना अधिक सुरक्षित, तत्पर आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यास त्याचा मोठा लाभ होणार आहे.
यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार, संजय कोकीळ, राजेश पिटले, भीमाशंकर सारवाडकर, विनोद पाटील, सावता हजारे, अतुल बक्षी, दशरथ देवकुळे, पांडुरंग बुरांडे, अमित नवाळे, राजेश तेलतुंबडे, चंद्रकांत कोळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कुलकर्णी व सुधाकर घोडके यांनी केले. आषाढी यात्रेदरम्यान भाविकांची सुरक्षा, आपत्कालीन परिस्थितीतील तात्काळ मदत व प्रभावी आपत्ती व्यवस्थापन यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असून, सुरक्षित आणि सुव्यवस्थित यात्रा पार पाडण्यासाठी मंदिर समिती कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Post Views: 52
Previous Post

बार्शी शहर पोलीस ठाणे यांचेकडून आषाढी एकादशीचे अनुषंगाने शहरात अवैध धंद्यावर कार्यवाही

Next Post

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील अडचणी किसान मोर्चाच्या माध्यमातुन सोडविण्यात येणार 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील अडचणी किसान मोर्चाच्या माध्यमातुन सोडविण्यात येणार 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील अडचणी किसान मोर्चाच्या माध्यमातुन सोडविण्यात येणार 

ताज्या बातम्या

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

September 4, 2026
ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

September 4, 2026
श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

September 4, 2026

सोलापूरसह राज्यभरात एकांकिका स्पर्धेचे बिगुल

September 4, 2026
बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

September 4, 2026
आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव — डॉ. वीरभद्र दंडे

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1164601

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!