माढा : विठ्ठल प्रतिष्ठान, निमगाव (टे.) संचलित आर्या पब्लिक स्कूल, माढा येथील विद्यार्थ्यांची सीबीएसईच्या कौशल्य विकास कौशल्य बोध व कृषी अभ्यासक्रम अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली.
या भेटीदरम्यान कृषी विज्ञान केंद्रातील डॉ.वळकुंडे डॉ.स्वाती कदम डॉ.पंकज डॉ.क्षिरसागर डॉ. वैरागकर यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, मृदा परीक्षण, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण, कृषी यांत्रिकीकरण, फळ व भाजीपाला लागवड, कृषी उद्योजकता तसेच शाश्वत शेतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध कृषी प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहून आधुनिक शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात केली.
सीबीएसईच्या कौशल्याधारित शिक्षणाच्या उद्दिष्टांनुसार विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, कौशल्य विकास, प्रयोगशीलता आणि कृषी क्षेत्राविषयी रुची निर्माण करण्यासाठी ही शैक्षणिक भेट अत्यंत उपयुक्त ठरली. विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील विविध संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेतल्या व तज्ज्ञांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन केले.
या क्षेत्रभेटीचे नियोजन विभागप्रमुख श्री. जयदेव गायकवाड यांनी केले.
या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिताताई शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य सागर थोरात कार्यालयीन अधिक्षक संभाजी पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली ही क्षेत्रभेट उत्कृष्ट नियोजन, सुरक्षितता आणि शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.