Saturday, July 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“गण गण गणात बोते”च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत

तरुण भारतbyतरुण भारत
July 18, 2026
in solapur
0
“गण गण गणात बोते”च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : आषाढी वारीनिमित्त शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आज सोलापूर शहरात टाळ-मृदुंगाच्या गजरात, “गण गण गणात बोते”च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. रूपा भवानी चौक येथे पालखीचे आगमन होताच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले.
          यावेळी उपमाहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे,पोलीस आयुक्त एम राजकुमार, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, शहर सुधारणा सभापती स्वाती बडगु. भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर,पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर  उपायुक्त सोनाली यादव,नगरसेवक संजय कोळी,नगरसेवक राजकुमार पाटील, नगरसेविका श्रीदेवी फुलारी, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेविका राजश्री दोडमनी , नगरसेविका श्वेता खरात, माजी नगरसेवक लता फुटाणे, ॲड. विजय मराठे तसेच भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, १८ व १९ जुलै रोजी सोलापूर शहरात संत श्री गजानन महाराज पालखीचा मुक्काम असून सुमारे ७०० वारकरी या पालखीसोबत सहभागी होत आहेत. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महानगरपालिकेने सर्व विभागांना सतर्क ठेवत २४ तास सेवा व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.पालखी मार्गावरील रस्त्यांची आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आली असून संपूर्ण मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.
          पालखीच्या मुक्कामासाठी कुचन प्रशाला तसेच उपलब्ध मंगल कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सर्व कामांसाठी महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.”संत श्री गजानन महाराजांची पालखी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजात श्रद्धा, सेवा, समता आणि एकात्मतेचा संदेश देणारी प्रेरणादायी परंपरा आहे.
         यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पालखी सोहळ्यादरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांनी वाहतूक सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महापालिकेचे सर्व अधिकारी,कर्मचारी अहोरात्र कार्यरत
सोलापूर शहरात आगमन करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व सुविधायुक्त वातावरण मिळावे, ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था, मुक्कामाची सोय तसेच आपत्कालीन सेवांची २४ तास उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. वारकरी हे आपल्या शहराचे मानाचे पाहुणे आहेत. त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. संतांच्या आशीर्वादाने आषाढी वारीचा हा सोहळा निर्विघ्न, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडेल, असा विश्वास महापौर कोंड्याल यांनी व्यक्त केला.
—-
Post Views: 18
Previous Post

देवकते बहीण-भाऊ यांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाच्या कॅम्पसाठी निवड

Next Post

महाळुंग येथिल महादेव मंदिराजवळील पाण्याच्या टाकीत आळ्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महाळुंग येथिल महादेव मंदिराजवळील पाण्याच्या टाकीत आळ्या

महाळुंग येथिल महादेव मंदिराजवळील पाण्याच्या टाकीत आळ्या

ताज्या बातम्या

ठेवीवरून नाट्य अन पत्रकार परिषद आता पुढे काय?

July 18, 2026

पालकमंत्री गोरे व जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी बुलेटवर फिरून केली पंढरपूरची पाहणी #solapurnews

July 18, 2026

विठ्ठलाच्या वारीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज -पालकमंत्री #viral #solapurnews

July 18, 2026
पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने श्री गजानन महाराज पालखीचे भव्य स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने श्री गजानन महाराज पालखीचे भव्य स्वागत

July 18, 2026
मानाचा कसबा गणपती परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

मानाचा कसबा गणपती परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

July 18, 2026
आजोबा गणपती येथे ढोल-ताशा वादन सरावाचा शुभारंभ

आजोबा गणपती येथे ढोल-ताशा वादन सरावाचा शुभारंभ

July 18, 2026
पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जवळजवळ तीनशे विद्यार्थ्यांसह वारकरी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहात साजरी

पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जवळजवळ तीनशे विद्यार्थ्यांसह वारकरी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहात साजरी

July 18, 2026

आषाढी यात्रेनिमित्त मंगळवेढा नगरपालिका प्रशासनाने  मांस मटन विक्रीवर बंदी घालावी 

July 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0984687

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!