Thursday, July 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण भारतbyतरुण भारत
July 23, 2026
in mumbai
0
उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Milind Kadam M4B

0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

            मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस म्हणाले, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवत आहेत. आरोग्य, पोषण, जलसुरक्षा, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि शालेय पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण काम करणारे उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

            मोंडेलेज इंडियाच्या ‘शुभ आरंभ’ या प्रमुख सामाजिक उपक्रमांतर्गत गेल्या १३ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ आणि खेड तालुक्यातील ६० गावांमध्ये स्थानिक गरजांनुसार आरोग्य, पोषण, शिक्षण, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि समुदाय विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला असून, शासनाच्या विविध योजनांनाही प्रभावी पूरक बळ मिळाले आहे.

आरोग्य सुविधांचे बळकटीकरण; लाखो नागरिकांना लाभ

            आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत अभियानाशी सुसंगत पद्धतीने ५० हेल्थ अँड वेलनेस सेंटरचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण करण्यात आले असून, त्याचा सुमारे ३.२ लाख नागरिकांना थेट लाभ झाला आहे. अॅनिमियामुक्त भारत अभियानाअंतर्गत महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षय ओळखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून सुमारे ५ हजार उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांची ओळख करून त्यांना विशेष उपचारासाठी संदर्भित करण्यात आले, तर एक हजारांहून अधिक पाच वर्षांखालील बालकांना प्रगत उपचारासाठी पाठविण्यात आले.

            २२६ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नवजात बालकांची घरपोच आरोग्य तपासणी, उच्च जोखमीच्या रुग्णांची ओळख आणि प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यात आली. आरोग्य जनजागृतीसाठी विविध विशेष आरोग्य शिबिरे तसेच जागतिक आरोग्य, क्षयरोग, मातृत्व आणि योग दिन साजरा करण्यात आला.

ग्रामीण क्रीडा विकासाला नवी दिशा

            ‘खेलो इंडिया’ अभियानाशी सुसंगत ‘शुभ आरंभ स्पोर्ट्स फॉर एक्सलन्स’ या उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्याचे काम करण्यात आले आहे. फुटबॉल आणि कबड्डीसारख्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक, जीवनकौशल्य प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            गेल्या दशकात सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रशिक्षणाचा लाभ मिळाला असून, त्यामध्ये मुलींचा सहभाग जवळपास ५० टक्के आहे. परिसरात १० क्रीडांगणे विकसित करण्यात आली आहेत. शालेय स्तरापासून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य सुरू आहे.

शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा उपक्रम

            ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. २७ आरओ पाणी शुद्धीकरण यंत्रणा, १२ स्वच्छतागृहे अनेक शाळांमध्ये संरक्षक भिंती, पेव्हिंग ब्लॉक आणि अन्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

            हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी ६० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वीज खर्चात दरवर्षी मोठी बचत होत आहे. तसेच विविध वाड्यांमध्ये सौर पथदिवे बसविण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेतही वाढ झाली आहे.

जलसंधारणातून शेतीला दिलासा

            जलसंधारण क्षेत्रात सहा जलसाठा संरचनांची निर्मिती व दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे २,००० लाख लिटर अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. याचा लाभ ३०० एकरांहून अधिक शेती आणि ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना झाला आहे.

            याशिवाय, पुढील दोन वर्षांत २० हून अधिक नवीन जलसंधारण प्रकल्प उभारून सुमारे २,५०० लाख लिटर भूजल पुनर्भरण क्षमता निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेततळी, बंधारे, बोअरवेल रिचार्ज आणि पर्जन्यजल संधारणासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.

पोषण शिक्षणातून निरोगी पिढी घडविण्याचा प्रयत्न

            शालेय विद्यार्थ्यांमध्ये सकस आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीची सवय निर्माण करण्यासाठी पुणे, सिंधुदुर्ग आणि मुंबई जिल्ह्यातील २३५ शाळांमध्ये पोषण शिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या माध्यमातून सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांपर्यंत सुरक्षित आणि सकस आहाराचा संदेश पोहोचविण्यात आला.

            ४७० शिक्षकांना ‘हेल्थ अँड वेलनेस अॅम्बेसेडर’ म्हणून प्रशिक्षित करण्यात आले असून, सर्व शाळांमध्ये ‘सेहत क्लब’ स्थापन करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि पोषणविषयक जनजागृतीसाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.

पुढील दोन वर्षांसाठी व्यापक कृती आराखडा

            या उपक्रमाचा पुढील टप्पा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, हेल्थ अँड वेलनेस सेंटरची गुणवत्ता वाढविणे, विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन, ग्रामीण क्रीडा विकासासाठी प्रगत प्रशिक्षण, तसेच जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाच्या नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

            शासनाच्या विविध योजनांशी प्रभावी समन्वय साधत ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण, जलसुरक्षा आणि जीवनमानात शाश्वत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

0000

Post Views: 5
Previous Post

मागील भांडणावरून  चाकू, काठीने  मारहाण – जाखले येथे एक जखमी

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श; शासनाच्या २७ सेवा एकाच छताखाली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श; शासनाच्या २७ सेवा एकाच छताखाली

ताज्या बातम्या

मनसेने ५६ खड्डे बुजवून केला मुख्यमंत्री यांचा वाढदिवस…….

July 23, 2026

सोलापुरात श्री जगन्नाथयात्रेचा भाविकांनी घेतला अभूतपूर्व आनंद……

July 23, 2026

संगमेश्वरच्या तरुणाईचा सहकार्य सेवेचा आविष्कार….

July 23, 2026
नाट्य अभिनेते संदीप पाठक यांची हॉटेल लि – मोर ला सदिच्छा भेट

नाट्य अभिनेते संदीप पाठक यांची हॉटेल लि – मोर ला सदिच्छा भेट

July 23, 2026
पंढरपूर शहर पोलिसांची आषाढी वारीच्या अनुषंगाने देशी दारू विरुद्ध मोठी कारवाई

पंढरपूर शहर पोलिसांची आषाढी वारीच्या अनुषंगाने देशी दारू विरुद्ध मोठी कारवाई

July 23, 2026
उमाबाई श्राविका विद्यालयात विठ्ठलनामाचा गजर; आषाढी एकादशीनिमित्त ‘वारकरी दिंडी’ उत्साहात!

उमाबाई श्राविका विद्यालयात विठ्ठलनामाचा गजर; आषाढी एकादशीनिमित्त ‘वारकरी दिंडी’ उत्साहात!

July 23, 2026
दहावी 1977-78 बॅच; माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

दहावी 1977-78 बॅच; माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

July 23, 2026
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद; करमाळ्यात तहसीलदारांना करमाळा बंदचे निवेदन

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद; करमाळ्यात तहसीलदारांना करमाळा बंदचे निवेदन

July 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0993340

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!