Thursday, July 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कर्जमाफीचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार- जिल्हा उपनिबंधक मुकूंद पवार

तरुण भारतbyतरुण भारत
July 23, 2026
in solapur
0
कर्जमाफीचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार- जिल्हा उपनिबंधक मुकूंद पवार
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर –  राज्य शासनाने जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ जिल्ह्यातील एकाही पात्र शेतकऱ्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्राधान्याने काम करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना अवैध सावकारीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील, असे मत सोलापूरचे नवनियुक्त जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी व्यक्त केले.

            मुकुंद पवार यांनी गुरुवारी सोलापूर जिल्हा उपनिबंधक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सहकार क्षेत्रातील आगामी कामकाजाची दिशा स्पष्ट केली. शेतकरी हा सहकार व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून त्यांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

             राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना पात्र लाभार्थ्यांची योग्य तपासणी करून कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. संबंधित विभागांशी समन्वय साधून ही प्रक्रिया जलद आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

           ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणींमुळे खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकतात. अशा अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अवैध सावकारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि संरक्षण देण्याचे काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

           यापुढील काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सहकारी पतसंस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका पारदर्शक आणि नियमबद्ध वातावरणात घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल. पतसंस्थांच्या सभासदांना त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पवार म्हणाले.

 

चौकट

अन्यथा नियमानुसार कठोर कारवाई

 

सहकारी पतसंस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे. ज्या पतसंस्थांमध्ये आर्थिक गैरप्रकार किंवा नियमबाह्य कामकाज आढळून येईल, त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. सहकारी संस्थांचा कारभार अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी सांगितले.

Post Views: 16
Previous Post

फोर्स मोटर्सने नवीन ‘अर्बानिया डिलक्स’ लॉन्च केली

Next Post

नीट पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी यासाठी माळशिरस मध्ये बंद

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नीट पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी यासाठी माळशिरस मध्ये बंद

नीट पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी यासाठी माळशिरस मध्ये बंद

ताज्या बातम्या

सोलापूरच्या यश बोरामणी व समर्थ दोरनाल यांची महाराष्ट्र संभाव्य क्रिकेट संघात निवड

सोलापूरच्या यश बोरामणी व समर्थ दोरनाल यांची महाराष्ट्र संभाव्य क्रिकेट संघात निवड

July 23, 2026

दिल्ली येथील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ माढा बंद

July 23, 2026

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

July 23, 2026
आषाढीसाठी सजली पंढरीतील प्रासादिक साहित्याची दुकाने

आषाढीसाठी सजली पंढरीतील प्रासादिक साहित्याची दुकाने

July 23, 2026

संतांचे पालखी सोहळे वाखरी मध्ये शेवटच्या मुक्कामासाठी गुरुवारी झाले दाखल

July 23, 2026
ग्लोबल दिंडी मध्ये श्वानाचाही सहभाग, मुक्या प्राण्यांनाही श्री विठ्ठलाची ओढ

ग्लोबल दिंडी मध्ये श्वानाचाही सहभाग, मुक्या प्राण्यांनाही श्री विठ्ठलाची ओढ

July 23, 2026
आषाढी यात्रेत ढोलक्यांना मागणी, ढोलकी विक्रीसाठी खास उत्तरप्रदेशातून कारगीर पंढरीत दाखल

आषाढी यात्रेत ढोलक्यांना मागणी, ढोलकी विक्रीसाठी खास उत्तरप्रदेशातून कारगीर पंढरीत दाखल

July 23, 2026
मंगळवेढ्यात कॉलेज परिसरात मोकाट फिरणार्‍या 13 रोड रोमिओंवर पोलीसांची कारवाई

मंगळवेढ्यात कॉलेज परिसरात मोकाट फिरणार्‍या 13 रोड रोमिओंवर पोलीसांची कारवाई

July 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0994299

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!