माळशिरस : नीट पेपर फुटी प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला माळशिरस शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आठवडा बाजार दिवस असून सुद्धा व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत आपली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला
देशभर गाजलेल्या नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्या तरुण-तरुणींवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधासाठी माळशिरस येथे बंद पुकारण्यात आला होता.
नीट पेपरफुटीची सर्वोच्च स्तरावर निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत
Post Views: 19