पंढरपुरात आषाढी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी आल्यानंतर आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली आहे. रामेश्वर ध्रुपद साबणे (रा. गंगाखेड, ता. गंगाखेड जि परभणी) आहे.
रामेश्वर ध्रुपद साबणे संभाजी नगर येथे एस आर पी होते. आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या ते पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी आले होते. त्यांनी पंढरपूर – कासेगाव रस्त्यावरील त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. याबाबत पोलीस यंत्रणेकडून अधिक तपास सुरू आहे.





















