भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सोलापूर येथे दिनांक २४ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. देवकर सर यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सामूहिक भक्तीमय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अभंग, भारूड व भक्तिगीत सादर करून वातावरण भक्तिरसात रंगवले.
प्राचार्य देवकर यांनी आपल्या मनोगतात पालखी सोहळ्याचे महत्त्व सांगताना, संत परंपरेतून समाजात एकात्मता, बंधुभाव आणि श्रद्धेचा संदेश दिला जातो, यावर विशेष भर दिला.
सामूहिक भक्तीमय स्पर्धेचे परीक्षक श्री कटारे व केंगार मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आतकरे यांनी केले. सूत्रसंचालन बोराळे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. माने यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रम आनंददायी व भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.
Post Views: 33