मोडनिंब – (ता.माढा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारासमोर पावसात मोठ्या प्रमाणात चिखल होऊन डबकी साचल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांना ये-जा करताना मोठी गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी स्वखर्चातून खडी-मुरूम टाकून प्रवेशद्वारावरील चिखलाची समस्या दूर केली.त्यातच डबकी साचत होती. खडी-मुरूम टाकल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुलभ रस्ता उपलब्ध झाला. याबद्दल पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत गिड्डे यांचे कौतुक केले.यावेळी प्रशांत गिड्डे म्हणाले, “‘माझी शाळा, गावची शाळा’ या भावनेतून प्रत्येकाने जिल्हा परिषद शाळांकडे लक्ष द्यावे. राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व उत्तम वातावरण मिळावे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे गिड्डे यांनी सांगितले.सामाजिक जाणिवेतून केलेल्या या कार्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली असून ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्हा परिषद शाळा या गावाच्या विकासाचा पाया आहेत. विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे, ही जबाबदारी आहे. गावातील अशा सामाजिक कामांसाठी पुढेही कायम तत्पर राहीन.”
प्रशांत गिड्डे
मनसे जिल्हाध्यक्ष
पाऊस पडला की शाळेच्या प्रवेशद्वारासमोर चिखल साचत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठी अडचण निर्माण होत होती. अनेकदा लहान मुले घसरून पडण्याची भीतीही होती. गिड्डे यांनी स्वखर्चातून खडी-मुरूम टाकल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मार्ग तयार झाला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल यांचे आभार मानतो.”
महेश पुरवत
पालक

















