सोलापूर : सोलापुरात ‘युवा भारत रोजगार पार्टी’ची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा या पक्षाचा निर्धार आहे, अशी माहिती पक्षाचे संस्थापक बसवराज येरनाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतातील प्रत्येक कुटुंबाला रोजगार प्रदान करणे, लोकशाही मजबूत करणे, भारत देशाला परकीय कर्जातून मुक्त करून भारताला समृध्दी प्राप्त करून देणे, संविधान-सामाजिक न्याय आणि समानता यांचे संरक्षण व संवर्धन करणे, भारताच्या / महाराष्ट्राच्या महसुलात किमान दुपटीने वाढ करणे, शिक्षणाद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकांचे जीवन हे आनंदी व सुखमय बनविणे व प्रत्येक नागरिकाचा मान-सन्मान-आवर प्रतिष्ठा अबाधित ठेवणे, भारत देश कृषी प्रधान राहण्याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करणे, न्याय व्यवस्था अधिक मजबूत करणे हे मुख्य ध्येय समोर ठेवून या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
ही पार्टी विविध महत्वाच्या लोकाभिमुख मागण्यांबाबत लढा देणार आहे. देशात पुढील कालावधीत होणाऱ्या सर्व निवडणूका पारदर्शी होण्याकरिता व लोकशाही मजबूत होणेकामी मतदान प्रक्रिया ही “इलेक्ट्रॉनिक पध्दतीने व बॅलेट पेपर पध्दतीने” एकाचवेळी घेण्यात याव्यात. आणि मतदारांना मतदान केल्याची पोच पावती मिळावी यासाठी हा पक्ष प्रयत्नशील राहणार आहे, असे येरनाळे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस सुरेश धुमकनाळे, सिध्दाराम बिराजदार, राजश्री जालनापुरे, ॲड.वराजू चव्हाण, हेमंतकुमार जैन, बाबास जाधव आदी उपस्थित होते.
Post Views: 12