सोलापूर : भारतातील अग्रगण्य मासिक पाळी स्वच्छता ब्रँड स्टेफ्रीने स्टेफ्री सिक्युअर एक्सएल सॅनिटरी पॅडचे अद्ययावत स्वरूप बाजारात सादर केले आहे. या उत्पादनात ‘पॅड बदलण्याचा इशारा’ आणि दुहेरी गळती प्रतिबंधक तंत्रज्ञान देण्यात आले असून, महिलांना १२ तासांपर्यंत सुरक्षित संरक्षण मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.
स्टेफ्री इंडियाच्या विपणन संचालिका सुप्रिया श्रीनिवास म्हणाल्या, हे वैशिष्ट्य महिलांची पाळीदरम्यानची चिंता कमी करून त्यांचा आत्मविश्वास वाढवेल. केनव्ह्यूचे बाल व महिला आरोग्य संशोधन व विकास विभागाचे प्रमुख डॉ.दिलीप त्रिपाठी यांनी महिलांच्या गरजांनुसार हे तंत्रज्ञान विकसित केल्याचे सांगितले.



















