कुर्डूवाडी – नैसर्गीक दृठ्या पुरग्रस्त परिस्थीतीचा अभ्यास करून तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी कुर्डूवाडी हद्दीत असलेल्या टेंभूर्णी रोडवरील कुर्डू बेंद ओढ्यावर नवीन पुल बांधकामासाठी दोन कोटी रूपये मंजूर केले.प्रत्यक्षात कामाच्या सुरवातीपासुनच पुलाचे काम वादात अडकले सत्ताधारी विरोधी नगरसेवकामधून इस्टीमेटनुसार काम होत नसल्याची तक्रार करत सभाग्रहात आवाज उठवला गेला मात्र तरीही नगराध्यक्ष जयश्री भिसे, मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी ठेकेदारापुढे नांगी टाकत जवळपास एक कोटी रूपयाचे बील अदा कसे केले याबाबत शहरात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या असून कामात गैरव्यवहार झाला असल्याचा संशय बळावला जात आहे.
काम एवढे निकृष्ठ आहे की त्याठीकाणी स्टीलचा कमी वापर, वाळू म्हणून पुर्णपणे डस्टचा वापर, पुलाची उंची, खालील बोगदा ईस्ठीमेट नूसार नसून अतीशय अनियमीत पणे झालेले आहे.यावर सभाग्रहात ज्या प्रभागातील काम आहे त्या प्रभागाच्या नगरसेविका भाग्यश्री पाटील यांच्यासह सेनेचे गटनेते ऋषीपाल वाल्मिकी यांनी सभाग्रात आवाज उठवला. मात्र यावर नगराध्यक्षा जयश्री भिसे ,मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी दुर्लक्ष करीत ठेकेदाराचेच समर्थन केले. खरे म्हणजे शहराच्या राजकारणातील आजपर्यंतचा ईतिहास पाहता शिवसेनेचे धनंजय डिकोळे,आर.पी.आय.चे बापूसाहेब जगताप व राष्टवादीचे गटनेते व माजी नगराध्यक्ष समिर मुलाणी यांनी कोणत्याही कामाला विरोध केला तर ते चालू शकत नाही व समर्थन केले तर ते कोणी अडवू शकत नाही असाच आहे. या पुलावर तर असमर्थनिय असाच अनियमीतता असूनही ते काम अजूनही चालुच आहे यामागचे गौडबंगाल लवरच समोर येइल.




















