बार्शी – पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ चा थकीत पीक विमा तात्काळ मिळावा आणि राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केलेली असतानाही बँकांकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सक्तीच्या वसुली नोटिसा थांबवाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी आज शुक्रवारी शेलगाव (मा) येथे शेतकऱ्यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी मंडळ अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विकास बारबोले यांनी कर्जमाफी झाली असतानाही बँकांकडून शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून मानसिक त्रास दिला जात आहे, तसेच हक्काचा २०२५ चा पीक विमा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी दिला दिला. तसेच आंदोलनस्थळी मुस्सा मुलाणी, हनुमंत भोसले, पांडुरंग घोलप यांनी मनोगत व्यक्त करताना पुढील काळात तीव्र आंदोलनासह कृषी मंत्री यांच्या घरावर रुंगणे मोर्चा काढण्याचा इशारा हि देण्यात आला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. प्रशासनाने मागण्यांची दखल घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन यावेळी हनुमंत भोसले यांनी शेलगाव येथील शेतकऱ्यांच्यावतीने तालुक्यातील इतर सर्व गावांमधील शेतकरी बांधवांना करण्यात आले.
यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख पांडुरंग घोलप,मुसा मुलानी, विकास बारबोले, विनोद होनकळस,ज्योतीराम शिंदे, प्रवीण मारकड, सुरज बारबोले, आतिश लोंढे, हनुमंत भोसले, अरुण व्हनकलस, दादा शिंदे, राम माळी, सागर वाघमोडे, कार्तिक बरगुळे, गणेश शिंदे, स्वप्नील मारकड, उमेश मार्कड, समाधान रोडे, बंटी रोडे, कृष्णा मारकड, भाऊ काटे, रणजीत बारंगुळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 5