अक्कलकोट – बबलाद तालुका अक्कलकोट येथील जिप कन्नड शाळे च्या छताचा गिलाव्याचा पापुद्रा पडून तेरा विद्यार्थी दोन शिक्षक जखमी झाले आहेत . शाळेचे स्ट्रक्चर ऑडीट झाले आहे का अशा शाळांची संख्या किती पंचायत समिती शिक्षण विभागाची चौकशी करा यासंबंधितावर कारवाई करा या मागणीसाठी
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर आणि
शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर
यांना वचित बहुजन आघाडी सोलापुर जिल्हा यांच्या वतीने जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने निवेदन दिले .
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनीकर
अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे छताच्या गिलाव्या चा पापुद्रा पडून तेरा विद्यार्थी व दोन शिक्षक जखमी झाले .याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावेत त्याचा अहवाल मिळावा त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळे कडून दुरुस्ती वेळ देखभाल साठी आतापर्यंत किती निधी उपलब्ध झालेला व कोणत्या कोणत्या शाळेला खर्च केलाय त्याचा अहवाल मिळावा सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत एकूण शिक्षक संख्या विद्यार्थी पटसंख्या किती आहे याचा अहवाल मिळावा .सोलापूर जिल्ह्यातील एकूण किती शाळा आहेत त्या सर्व शाळेचे इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून धोकादायक असलेले शाळा तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे . त्याचा अहवाल मिळावा याव्यतिरिक्त सर्व शाळांमध्ये पाण्याची सोय व शौचालयाची सोय करण्यात यावी अशा प्रकारची मागणी निवेदनात करण्यात आली
जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे प्रशांत गोळेवार युवक शहराध्यक्ष महेश जाधव युवक शहर सचिव नरेंद्र शिंदे शहर महासचिव विनोद इंगळे सुहास दादा सावंत शाहिद शेख शरीफ शेख अक्कलकोट तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख विजय गायकवाड विजयानंद उघडे आणि श्रीनिवासं संगे पान आधी उपस्थित होते
Post Views: 11