Tuesday, September 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापालिकेच्या सात जागांचे बीओटी तत्त्वावर मुद्रीकरण 

तरुण भारतbyतरुण भारत
August 15, 2026
in solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर :  महापालिकेच्या निष्क्रिय व अविकसित जागांचे मुद्रीकरण करून उत्पन्न वाढविण्याच्या धोरणांतर्गत सात जागांचा विकास प्रस्तावित आहे. त्यातील सात रस्ता येथील ७७ हजार चौरस फुटांच्या बस डेपोच्या जागेवर १५० कोटींच्या गुंतवणुकीतून कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याचा पायलट प्रकल्प प्रस्तावित असून, त्यातून महापालिकेला सुमारे ६० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण संबंधित के पी एम जी कंपनीकडून महापालिकेत करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.
         महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या मालमत्ता मुद्रीकरण धोरणानुसार सोलापूर महापालिकेच्या अविकसित व निष्क्रिय जागांचा व्यावसायिक विकास करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेच्या मालकीच्या सात जागा प्राथमिक स्तरावर निश्चित करण्यात आल्या असून, त्यापैकी सात रस्ता येथील महापालिका बस डेपोची ७७ हजार चौरस फुटांची जागा पायलट प्रकल्पासाठी निवडण्यात आली आहे. या जागेवर सुमारे १५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यातून महापालिकेला सुमारे ६० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.
        सात रस्ता बस डेपोच्या जागेच्या विकासासंदर्भात संबंधित केपीएमजी कंपनीच्या प्रतिनिधींनी गुरुवारी महापालिका पदाधिकाऱ्यांसमोर प्रकल्पाचे सादरीकरण केले. महापौर विनायक कोंडयाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्यासह पदाधिकारी तसेच नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
         शासनाच्या धोरणानुसार महापालिकेच्या मालमत्तांचा विकास बीओटी (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) तत्त्वावर करण्याचा विचार आहे. जागेची सद्यस्थिती, आरक्षण, अतिक्रमण, विकासाची क्षमता, बाजारपेठेतील मागणी, अंदाजित खर्च, अपेक्षित महसूल आणि परतावा या निकषांवर जागांचे आर्थिक विश्लेषण केले जाणार आहे. आरक्षणात कोणताही बदल न करता, लागू नियमांनुसारच विकास करण्याचे धोरण आहे.
सात रस्ता बस डेपोच्या जागेवर सध्या महापालिकेला कोणतेही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या जागेचा व्यावसायिक वापर करून महसूल मिळविण्याचा प्रस्ताव आहे. याचबरोबर गोल्डफिंच पेठ आणि नवी पेठ येथील शॉपिंग सेंटरच्या जागांचाही विकास प्रस्तावित असून, नवी पेठेतील प्रकल्पातून महापालिकेला सुमारे २० कोटी रुपयांचा प्रीमियम मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
राज्यातील दहा प्रकल्पांत सोलापूरचा समावेश
राज्यभरातील दहा प्रकल्पांमध्ये सोलापूरच्या सात रस्ता बस डेपोच्या जागेवरील प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील हा पहिला पायलट प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे.
           शहरातील एकूण २८ जागांचा प्राथमिक स्तरावर विचार केला जात असून, गुणांकनाच्या आधारे जागांची निवड करण्यात येणार आहे. अंतिम निर्णय नगरविकास विभागाकडून घेतला जाणार आहे.
सात जागांसाठी स्वतंत्र प्रकल्प अहवाल
प्राथमिक स्तरावर निश्चित केलेल्या सात जागांसाठी संबंधित वेंडरकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. यामध्ये निविदेच्या अटी-शर्ती, पेमेंट मॉडेल, प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी, विकासकाची आर्थिक व तांत्रिक क्षमता आदींचा समावेश असेल. महापालिकेच्या मालमत्ता निश्चिती समितीमार्फत प्रक्रिया राबविली जाणार असून, राज्यस्तरीय मूल्यमापन समिती आर्थिक व तांत्रिक बाबींचा अभ्यास करणार आहे.
मालमत्ता मुद्रीकरणातून मिळणारा महसूल पुन्हा नागरी पायाभूत सुविधा, त्यांचा विकास व देखभाल यासाठी वापरण्याचा प्रशासनाचा विचार आहे. निष्क्रिय भूखंड आर्थिकदृष्ट्या सक्रिय करून महापालिकेचे वित्तीय परावलंबित्व कमी करणे आणि नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे, हा या धोरणामागील प्रमुख उद्देश आहे.
जय भवानी शाळेला कोणत्याही प्रकारे
बाधा किंवा अडचण नाही : महापौर
या प्रकल्पा अंतर्गत जय भवानी प्रशाला समोरील जागेचाही प्रस्ताव सुचविण्यात आला आहे. मात्र या संदर्भात गैरसमज निर्माण झाला आहे या शाळेला कोणतीही अडचणी या प्रकल्पाची होणार नाही. ही शाळा सुरूच राहणार आहे. केवळ समोरील खुल्या जागेवर आरक्षण जैसे ते ठेवूनच ही जागा विकसित करून प्रकल्प उभारण्याचा विचार आहे. यामुळे शाळा विकणे अथवा बंद होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असे स्पष्टीकरण महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले.
सहा महत्त्वाचे मुद्दे
– सात रस्ता बस डेपो : ७७ हजार चौ.फुट जागेवर १५० कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव.
– महापालिकेला ६० कोटी : सात रस्ता प्रकल्पातून सुमारे ६० कोटींच्या उत्पन्नाची प्राथमिक अपेक्षा.
– सध्या शून्य उत्पन्न : बस डेपोच्या जागेतून महापालिकेला सध्या कोणतेही उत्पन्न मिळत नाही.
– नवी पेठेत २० कोटींचा प्रीमियम : गोल्डफिंच पेठ, नवी पेठ शॉपिंग सेंटरच्या जागांचाही विकास प्रस्तावित.
– २८ जागांचा विचार : प्राथमिक स्तरावर शहरातील २८ जागा विचाराधीन; त्यातून गुणांकनानुसार जागांची निवड.
– महसूल पुन्हा विकासासाठी : मुद्रीकरणातून मिळणारा महसूल नागरी पायाभूत सुविधा व त्यांच्या देखभालीसाठी वापरण्याचा विचार.
—-
Post Views: 97
Previous Post

मुद्रांक शुल्क न भरल्याने एमसीएसोबतचा क्रीडा संकुलाचा करार रद्द

Next Post

आ. सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालण्या साठी अमिष  – आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आ. सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालण्या साठी अमिष  - आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

ताज्या बातम्या

ऊसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची झाडे जप्त

ऊसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची झाडे जप्त

September 29, 2026
सेवा संकल्प अभियानातून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

सेवा संकल्प अभियानातून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

September 29, 2026

18 वर्षीय तरुणाची गळफासाने आत्महत्या

September 29, 2026
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

September 29, 2026

श्री भ्रमरांबिका नवरात्र महोत्सव मंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी शिवानंद बेलाटे

September 29, 2026

दिव्यांग, ज्येष्ठांसाठी मनपाचे गुरुवारी मोफत आरोग्य शिबिर

September 29, 2026

श्री भगवंत देवस्थानच्यावतीने नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन 

September 29, 2026

भटके विमुक्त विकास परिषदेमार्फत विशेष शिबिराचे आयोजन

September 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1276814

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!