पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील काळामळा रामभाऊ पिसे यांच्या पडीक शेतात दुपारी 3 वाजुन 10 मिनीटांनी पोलीसांनी जुगार ( तिरट 52 पत्ती) खेळत असतानाच पोलीसांनी अचानक याठिकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी सहाजण जुगार खेळत असतानाच त्यांना रंगेहाथ पकडले यामध्ये तानाजी लोखंडे, उमाजी बोडरे, रफीक बागवान, सोनु सोनवणे, अजित माने ,शंकर बोडरे यांना जागेवरच पकडले त्यांचेकडे रोख रक्कम 64 हजार 80 रुपये ,पाच मोबाईल व चार मोटारसायकली असा एकुण तिन लाख चौरयाहततर हजार पाचशे ऐशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अकलूज व पिलीव पोलीसांनी सदरची कारवाई संयुक्तपणे केली यामध्ये ही कारवाई ए.एस.आय देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव, गोरवे, मिरगणे, पोलीस हवालदार शंकर मरळे, नितीन लोखंडे यांनी केली. या गुन्हाची नोंद माळशिरस पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.या कारवाईने पिलीव परीसरात एकच खळबळ उडाली असुन जुगार, मटका व इतर अवैध धंदेवालयाचे यामुळे धाबे दणाणले आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















