पिलीव – माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्यावर स्वातंत्र्य दिनानिमीत ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे होते.
या वेळी बोलताना ऊस उत्पादक शेतकरी रामभाऊ मगर म्हणाले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी थोर स्वातंत्र्य वीरांनी त्याग केला त्यांच्या प्रति आदरभाव व स्मरण केले पाहिजे. त्यांच्या मुळेच आपण स्वातंत्र्यात आहोत त्यांचा आदर्श ङोळ्यासमोर ठेवुन वाटचाल केली पाहिजे. ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील ,संचालिका रेखाताई बोञे पाटील ,प्रशांतराव बोञे पाटील यांनी बंद असणारे साखर कारखाने चालु करून संपूर्ण देशभरात एक आदर्श निर्माण केला.यावेळी सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले या वेळी केन मॅनेजर शरद देवकर, चीफ इंजीनियर तानाजीराव देवकते ,प्रोसेसिंग मॅनेजर समाधान गायकवाड ,मेजर मोहन घोङके ,धनाजीराव पवार, निलेश गुरव ,प्रविण पिसे ,तात्या पांढरे, सर्व खाते प्रमुख ,कर्मचारीवर्ग सुरक्षारक्षक उपस्थित होते. आभार रमेश आवताडे यांनी मानले. फोटो _ चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम.
Post Views: 11