सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात १५ ऑगस्ट रोजी भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. याशिवाय, विद्यापीठाच्या सुरक्षारक्षक पथक आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन केले. उपस्थित, शिक्षक, अधिकारी व विद्यार्थी यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना कुलगुरूंनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. “विद्यापीठाला ‘ग्रीन कॅम्पस’ बनवण्यासाठी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग मिळत आहे. कॅम्पस अधिक हिरवागार करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत,” असे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी सकाळी विध्यार्थी शिक्षक, अधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी रंगभवन येथील अभ्यासकेंद्रावरून विद्यापीठापर्यंत जाणाऱ्या सशुल्क बस सेवेचे उद्घाटन सकाळी ७:०० वाजता कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, विद्यार्थी विकास संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, अधिष्ठाता डॉ. महेश खरात, तसेच डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. उमराव मेटकरी, डॉ. मलिक रोकडे, डॉ. अभिजीत जगताप, डॉ. राजेंद्र वडजे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते.

























