बार्शी – दत्तनगर येथील माऊली प्री इंग्लिश स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष तुळशीदास मस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मेजर गजधने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे राष्ट्रगीत,वंदे मातरम, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत गायले. इंग्रजीमध्ये विद्यार्थ्यांनी अस्खलितपणे भाषणे केली.अध्यक्षीय भाषणामध्ये तुळशीराम मस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अभ्यास तसेच देशभक्ती, आत्मविश्वास, सकारात्मकता, प्रयत्नात सातत्य, अज्ञाधारकपणा, खिलाडू वृत्ती, धाडस, सकस आहार, वृक्ष संवर्धन, आरोग्य, पर्यावरण, चांगल्या सवयी तसेच निरोग जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. मेजर गजधने यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती विषयी उदाहरणे दिली. तसेच आई-वडील आणि शिक्षकांच्या आज्ञा पाळा असेही बजावून सांगितले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजयसिंह पाटील, सचिव अर्चना पाटील,शिक्षक व पालक उपस्थित होते.
Post Views: 8