Tuesday, October 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एमपीएससीच्या भरतीत स्पर्धेचा उच्चांक; ५,७०७ जागांसाठी तब्बल १२.६३ लाख अर्ज

तरुण भारतbyतरुण भारत
August 19, 2026
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’मध्ये यंदा अर्जांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. तब्बल १२ लाख ६३ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, ५,७०७ पदांसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून सुमारे ४१ हजार उमेदवारांनी अर्ज भरल्याची माहिती आहे.
आयोगाने २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत सुरुवातीला २,६१९ पदांची भरती जाहीर केली होती. त्यानंतर विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या मागणीपत्रांचा विचार करून आयोगाने आणखी ३,०८८ पदांची भर घातली. त्यामुळे पदांची एकूण संख्या ५,७०७ झाली आहे. पदसंख्येत झालेली ही मोठी वाढ उमेदवारांसाठी दिलासादायक असली, तरी अर्जदारांची संख्या पाहता प्रत्येक जागेसाठी मोठी चुरस राहणार आहे.
या भरतीतील सर्वाधिक चर्चेचे पद असलेल्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) गट-क संवर्गात १,५३९ जागा आहेत. याशिवाय महसूल व वन विभागातील लिपिक-टंकलेखक ४८०, नोंदणी व मुद्रांक विभागातील लिपिक-टंकलेखक ३३९, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी २५४, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयातील २३० पदांसह विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे.अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात १५५, आदिवासी विकास विभागात ६९, तर सहाय्यक अधीक्षक तसेच वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक व अभिलेखापाल या पदांचाही भरतीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी विविध विभागांचे आरक्षणनिहाय अतिरिक्त तक्ते प्रसिद्ध केले जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पदसंख्या कमी आहे किंवा एखाद्या संवर्गाचा समावेश झालेला नाही, असे समजून उमेदवारांनी अर्ज करण्याचे टाळू नये, असे आवाहन आयोगाने केले आहे.
कोट
‘अर्जदार वाढत आहेत, परीक्षा वेळेत घ्या’
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. परीक्षांच्या कालावधीत वाढ होत असल्याने बेरोजगार उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाच लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केल्यास सर्वांसाठी सरसकट ५०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्याचा विचार शासनाने करावा. परीक्षा प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास उमेदवारांना रोजगाराची संधी मिळेल आणि पुढील भरतीमध्ये अर्जदारांची संख्या कमी होण्यास मदत होईल. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबवून वेळेत परीक्षा, निकाल, निवड आणि नियुक्तीचे आदेश देणे गरजेचे असल्याचे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोशिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी सांगितले.
चौकट
आकडेच सांगतात स्पर्धेची तीव्रता
१२.६३ लाख अर्ज : ५,७०७ पदे
सोलापूर : सुमारे ४१ हजार अर्जदार
नव्याने वाढलेली पदे : ३,०८८
सुरुवातीची पदसंख्या : २,६१९
अंतिम पदसंख्या : ५,७०७
Post Views: 76
Previous Post

युवा शक्ती व्यसनमुक्त भारतासाठी : MIT कनिष्ठ महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

Next Post

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा; लेबर फेडरेशनची मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा; लेबर फेडरेशनची मागणी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा; लेबर फेडरेशनची मागणी

ताज्या बातम्या

शक्तिदेवीच्या घटस्थापनेसाठी पालकमंत्री गोरे यांना संयुक्त निमंत्रण

शक्तिदेवीच्या घटस्थापनेसाठी पालकमंत्री गोरे यांना संयुक्त निमंत्रण

October 5, 2026
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढतीचे संकेत

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढतीचे संकेत

October 5, 2026

संचालक होण्यासाठी नव्हे, समर्थ बँक पुन्हा सक्षम करण्यासाठी निवडणूक

October 5, 2026
मध्यच्या रेल्वे वेळेवर चालवा, कामटे संघटनेची मागणी

मध्यच्या रेल्वे वेळेवर चालवा, कामटे संघटनेची मागणी

October 5, 2026

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी केंद्र सरकारचे राज्य शासनाला निर्देश शिक्षक सहकार संघटनेच्या आंदोलनाला यश

October 5, 2026

आचारसंहितेनंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्या

October 5, 2026
चैतन्य हास्य योग मंडळाचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात

चैतन्य हास्य योग मंडळाचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात

October 5, 2026

समाजाशी जोडलेली कविता लिहा : डॉ. प्रसन्न पाटील 

October 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1308007

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!