मोडनिंब – श्रीक्षेत्र अरण चे भाग्यविधाते हरिभाऊ नाना शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हरिभाऊ ( नाना )शिंदे फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार मनोहर डोंगरे यांना जाहीर झाला आहे.हा पुरस्कार प्रदान सोहळा माजी आ. विनायकराव पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील भुषविणार आहेत. हरिभाऊ नाना शिंदे फाऊंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी महिती फाऊंडेशनचे अध्यक्ष यशवंत शिंदे यांनी दिली. यामध्ये शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता संत सावता माळी विद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा,दि. शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी स. ९ वाजता रक्तदान शिबिर, मॉडर्न इंग्लिश स्कूल मधील मुलांना खाऊ वाटप, बुधरानी हॉस्पिटलच्या वतीने मोतीबिंदू तपासणी शिबिर, डोळे तपासणी शिबिर, वृक्ष वाटप, वृक्ष संवर्धन स्पर्धेचे पारितोषिक वितरण व सकाळी दहा वाजता मनोहर भाऊ डोंगरे यांना हरिभाऊ(नाना ) शिंदे जीवन गौरव पुररस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत शिंदे उपाध्यक्ष अँँड आनंद कुलकर्णी सचिव बाबासाहेब शेळके सहसचिव संजय शिंदे,सावता घाडगे, सतीश घाडगे, डॉ. आशिष शेंडगे यांनी केले आहे.





















