अकलूज – भारतीय स्वतंत्रदिनाचा ८० वा वर्धापन दिन स्कूलमध्ये उत्साहात आणि राष्ट्रभक्त पर वातावरणात साजरा करण्यात आला. कर्नल डॉ. नीतूल बेवल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी राष्ट्रगीताचे गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर ध्वजगीत, वंदेमातरम गायन झाले.
स्कूलमधील विद्यार्थी, विद्यार्थीनिनी उत्कृष्ट कवायतीचे संचालन करून वाहवा मिळवली. जय जवान जय किसान या देशभक्तीपर थिमचे सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. स्कूलच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन कर्नल डॉ. नितूल बेवल यांच्या शुभास्ते तसेच स्कूलचे चेअरमन श्री. नितीन देशमुख, प्राचार्य डॉ. प्रशांत योटे यांच्या हस्ते करण्यात आले.
NCC विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कर्नल डॉ. नितूल बेवल यांनी आपल्या मनोगतातून उत्तम शिक्षण आत्मसात करा आरोग्यविषयक जाणीव आवडीचे खेळ जोपासा, खेळाकडे वळा तसेच संस्कारित व्हा. देशभक्ती, राष्ट्रप्रेम मनामध्ये ठेवा असे विचार त्यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. प्रशांत थोटे यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे कार्य, स्कूल विषयी माहिती सांगून स्कूल स्थापन करण्याचा हेतू सांगितला स्कूलचे चेअरमन श्री. नितीन देशमुख, कर्नल डॉ. नितूल बेवल सौ. श्वेला बेवल, राकले साहेब आदी मान्यवर तसेच पालक यावेळी उपस्थित होते.
स्कूलचे विश्वस्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. विजयसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे माजी आमदार मा.श्री. रणजितसिंग मोहिते पाटील खासदार मा.श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय स्वतंत्रदिनाच्या निमित्ताने शुभेच्या दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूलमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.९वीतील विद्यार्थिनीनी केले आभार इ १० वीतील विद्यार्थिनीनी मानले. यावेळी भारत माता की जय, वंदेमातरमचा जय घोष करण्यात आला.
Post Views: 4