Tuesday, October 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुणे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन जाहीर

तरुण भारतbyतरुण भारत
August 19, 2026
in solapur
0
पुणे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन जाहीर
0
SHARES
122
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

​सोलापूर – महाराष्ट्र शासन उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभागाच्या वतीने सन २०२६-२७ या वर्षात आयोजित होणाऱ्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचे वेळापत्रक  व ९४ क्रीडा प्रकारांचे वाटप उपसंचालक युवराज नाईक यांनी जाहीर केले आहे. यात सोलापूर क्रीडा कार्यालयाकडे 15 अनुदानित व 14 विना अनुदानित अशा 29 खेळ प्रकारांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे

 

पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीनही जिल्ह्यांच्या क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या समन्वयाने या स्पर्धा पार पडणार असून,

या स्पर्धेत 48 अनुदानित व 46 विनाअनुदानित खेळ प्रकारांचा समावेश आहे. विनाअनुदानित खेळ प्रकार संबंधित संघटनेने स्वखर्चाने आयोजित करायचे आहेत. राज्यस्तरीय स्पर्धांच्या पूर्वी संबंधित विभागीय स्पर्धा पूर्ण करणे बंधनकारक असून, आयोजक जिल्ह्यांनी इतर जिल्ह्यांशी संपर्क साधून व योग्य ती पूर्वतयारी करून विभागीय स्पर्धांचे वेळापत्रक निश्चित करण्याचे निर्देश उपसंचालक नाईक यांनी दिले आहेत.

 

​​महत्त्वाचे निर्देश व अटी:

​ऑनलाइन प्रक्रिया: क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी संचालनालयाच्या सूचनांनुसार ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करून योग्य ती कार्यवाही करावी.

​ओळखपत्र व प्रमाणपत्र: विभागीय स्पर्धा आयोजनदरम्यान खेळाडूंच्या ओळखपत्रावर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या प्रतिस्वाक्षरीबाबत आग्रह धरू नये; मात्र आवश्यकते नुसार प्रमाणपत्रे ऑनलाइन तपासावीत.

​प्राविण्य यादी: स्पर्धा संपल्यानंतर प्राविण्य प्राप्त संघ, खेळाडूंची यादी तसेच निवड चाचणीसाठी निवड झालेल्या खेळाडूंची यादी तात्काळ पोर्टलवर अपलोड करावी.

​प्राथमिक सुविधा: प्रत्येक स्तरावरील स्पर्धा काळात किमान प्रथमोपचाराची व्यवस्था व खेळाडूंसाठी आवश्यक क्रीडा सुविधा आणि साहित्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.

निवास व्यवस्था : ​या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडू, संघ व संघव्यवस्थापक यांच्या निवास व्यवस्थेची जबाबदारी संबंधित जिल्ह्याची राहणार असल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

——–

विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे खेळ, वयोगट आणि आयोजक कार्यालय :

 

सोलापूर : अनुदानित खेळ – आर्चरी, बॉल बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, ज्युदो, कबड्डी, खो-खो (१९ वर्षे मुले/मुली), लॉन टेनिस, मल्लखांब, शुटिंगबॉल, डायव्हिंग, व्हॉलीबॉल, कुस्ती, रग्बी, आट्यापाट्या.

विनाअनुदानित- आट्टे दु आखाडा, फिल्ड आर्चरी, मोंटेक्सबॉल क्रिकेट, हाफकिडो बॉक्सिंग, वूडबॉल, थांग ता मार्शल आर्ट, रस्सीखेच, टेनिस क्रिकेट, जित कुने दो, टेबल सॉकर, चॉकबॉल, शस्त्रांग मार्शल आर्ट/चायक्वांदो आणि फुटबॉल टेनिस.

———-

पुणे : अनुदानित खेळ- ज्युनिअर व सबज्युनिअर नेहरू कप हॉकी, ​​ॲथलेटिक्स, बेसबॉल, कॅरम, बुद्धीबळ, सायकलींग रोड रेस, डॉजबॉल, फुटबॉल (१७वर्षे मुले/मुली), जिम्नॅस्टीक्स, कराटे,​ खो खो (१४, १७वर्षे मुले/मुली), किक बॉक्सिंग, रोलबॉल, रोलर स्केटींग, रोलर हॉकी, सॉफ्टबॉल, स्क्वॅश, टेबल टेनिस, तायक्वांदो, वेटलिफ्टींग, मॉडर्न पेंटथलॉन, सेपक टकरा, सॉफ्ट टेनिस, टेनिक्वाइट.

विनाअनुदानित- कुडो, बेल्ट रेसलिंग, थायबॉक्सिंग, टेनिस व्हॉलीबॉल, कुराश, पॉवरलिफ्टींग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल, फुटसाल, कॉर्फबॉल, हुप क्वान दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, लंगडी, बुडो, कलरीपयत्तु,गतका

——–

अहिल्यानगर : अनुदानित खेळ- सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप, बॅडमिंटन, ​क्रिकेट, ​तलवारबाजी, फुटबॉल (१४, १९ मुले/मुली), ​हँडबॉल, ​हॉकी, ​नेटबॉल, ​रायफल शुटिंग, जलतरण व वॉटरपोलो, थ्रोबॉल, ​वूशू,​ योगासन.

विनाअनुदानित- युनिफाईट, स्पीडबॉल, टॅंग-सु-दो, ​मिनीगोल्फ, ​सुपर सेवन क्रिकेट, फ्लोरलबॉल, रोप स्केपिंग, सिलंबम, लगोरी, युग मुन दो, ग्रॅपलिंग, पेंट्याक्यू, जंपरोप, स्पोर्ट डान्स, म्युझिकल चेअर, टेनिसबॉल क्रिकेट

——

Post Views: 351
Previous Post

माढा तालुक्यातील लऊळ येथे शेतजमीन मोजणीसाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्ताची मागणी

Next Post

पंढरपूर शहरातील गोविंदपुरा भागात घरात पकडला गुटखा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पंढरपूर शहरातील गोविंदपुरा भागात घरात पकडला गुटखा

पंढरपूर शहरातील गोविंदपुरा भागात घरात पकडला गुटखा

ताज्या बातम्या

शक्तिदेवीच्या घटस्थापनेसाठी पालकमंत्री गोरे यांना संयुक्त निमंत्रण

शक्तिदेवीच्या घटस्थापनेसाठी पालकमंत्री गोरे यांना संयुक्त निमंत्रण

October 5, 2026
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढतीचे संकेत

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढतीचे संकेत

October 5, 2026

संचालक होण्यासाठी नव्हे, समर्थ बँक पुन्हा सक्षम करण्यासाठी निवडणूक

October 5, 2026
मध्यच्या रेल्वे वेळेवर चालवा, कामटे संघटनेची मागणी

मध्यच्या रेल्वे वेळेवर चालवा, कामटे संघटनेची मागणी

October 5, 2026

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी केंद्र सरकारचे राज्य शासनाला निर्देश शिक्षक सहकार संघटनेच्या आंदोलनाला यश

October 5, 2026

आचारसंहितेनंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्या

October 5, 2026
चैतन्य हास्य योग मंडळाचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात

चैतन्य हास्य योग मंडळाचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात

October 5, 2026

समाजाशी जोडलेली कविता लिहा : डॉ. प्रसन्न पाटील 

October 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1306492

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!