सोलापूर – महाराष्ट्र शासन उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभागाच्या वतीने सन २०२६-२७ या वर्षात आयोजित होणाऱ्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचे वेळापत्रक व ९४ क्रीडा प्रकारांचे वाटप उपसंचालक युवराज नाईक यांनी जाहीर केले आहे. यात सोलापूर क्रीडा कार्यालयाकडे 15 अनुदानित व 14 विना अनुदानित अशा 29 खेळ प्रकारांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे
पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीनही जिल्ह्यांच्या क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या समन्वयाने या स्पर्धा पार पडणार असून,
या स्पर्धेत 48 अनुदानित व 46 विनाअनुदानित खेळ प्रकारांचा समावेश आहे. विनाअनुदानित खेळ प्रकार संबंधित संघटनेने स्वखर्चाने आयोजित करायचे आहेत. राज्यस्तरीय स्पर्धांच्या पूर्वी संबंधित विभागीय स्पर्धा पूर्ण करणे बंधनकारक असून, आयोजक जिल्ह्यांनी इतर जिल्ह्यांशी संपर्क साधून व योग्य ती पूर्वतयारी करून विभागीय स्पर्धांचे वेळापत्रक निश्चित करण्याचे निर्देश उपसंचालक नाईक यांनी दिले आहेत.
महत्त्वाचे निर्देश व अटी:
ऑनलाइन प्रक्रिया: क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी संचालनालयाच्या सूचनांनुसार ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करून योग्य ती कार्यवाही करावी.
ओळखपत्र व प्रमाणपत्र: विभागीय स्पर्धा आयोजनदरम्यान खेळाडूंच्या ओळखपत्रावर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या प्रतिस्वाक्षरीबाबत आग्रह धरू नये; मात्र आवश्यकते नुसार प्रमाणपत्रे ऑनलाइन तपासावीत.
प्राविण्य यादी: स्पर्धा संपल्यानंतर प्राविण्य प्राप्त संघ, खेळाडूंची यादी तसेच निवड चाचणीसाठी निवड झालेल्या खेळाडूंची यादी तात्काळ पोर्टलवर अपलोड करावी.
प्राथमिक सुविधा: प्रत्येक स्तरावरील स्पर्धा काळात किमान प्रथमोपचाराची व्यवस्था व खेळाडूंसाठी आवश्यक क्रीडा सुविधा आणि साहित्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.
निवास व्यवस्था : या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडू, संघ व संघव्यवस्थापक यांच्या निवास व्यवस्थेची जबाबदारी संबंधित जिल्ह्याची राहणार असल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
——–
विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे खेळ, वयोगट आणि आयोजक कार्यालय :
सोलापूर : अनुदानित खेळ – आर्चरी, बॉल बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, ज्युदो, कबड्डी, खो-खो (१९ वर्षे मुले/मुली), लॉन टेनिस, मल्लखांब, शुटिंगबॉल, डायव्हिंग, व्हॉलीबॉल, कुस्ती, रग्बी, आट्यापाट्या.
विनाअनुदानित- आट्टे दु आखाडा, फिल्ड आर्चरी, मोंटेक्सबॉल क्रिकेट, हाफकिडो बॉक्सिंग, वूडबॉल, थांग ता मार्शल आर्ट, रस्सीखेच, टेनिस क्रिकेट, जित कुने दो, टेबल सॉकर, चॉकबॉल, शस्त्रांग मार्शल आर्ट/चायक्वांदो आणि फुटबॉल टेनिस.
———-
पुणे : अनुदानित खेळ- ज्युनिअर व सबज्युनिअर नेहरू कप हॉकी, ॲथलेटिक्स, बेसबॉल, कॅरम, बुद्धीबळ, सायकलींग रोड रेस, डॉजबॉल, फुटबॉल (१७वर्षे मुले/मुली), जिम्नॅस्टीक्स, कराटे, खो खो (१४, १७वर्षे मुले/मुली), किक बॉक्सिंग, रोलबॉल, रोलर स्केटींग, रोलर हॉकी, सॉफ्टबॉल, स्क्वॅश, टेबल टेनिस, तायक्वांदो, वेटलिफ्टींग, मॉडर्न पेंटथलॉन, सेपक टकरा, सॉफ्ट टेनिस, टेनिक्वाइट.
विनाअनुदानित- कुडो, बेल्ट रेसलिंग, थायबॉक्सिंग, टेनिस व्हॉलीबॉल, कुराश, पॉवरलिफ्टींग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल, फुटसाल, कॉर्फबॉल, हुप क्वान दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, लंगडी, बुडो, कलरीपयत्तु,गतका
——–
अहिल्यानगर : अनुदानित खेळ- सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप, बॅडमिंटन, क्रिकेट, तलवारबाजी, फुटबॉल (१४, १९ मुले/मुली), हँडबॉल, हॉकी, नेटबॉल, रायफल शुटिंग, जलतरण व वॉटरपोलो, थ्रोबॉल, वूशू, योगासन.
विनाअनुदानित- युनिफाईट, स्पीडबॉल, टॅंग-सु-दो, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, फ्लोरलबॉल, रोप स्केपिंग, सिलंबम, लगोरी, युग मुन दो, ग्रॅपलिंग, पेंट्याक्यू, जंपरोप, स्पोर्ट डान्स, म्युझिकल चेअर, टेनिसबॉल क्रिकेट
——






















