पंढरपूर – शहरातील गोविंदपुरा भागात घरात गुटखा, मावा तयार करून विक्री करीत असताना पोलिसांनी छापा टाकून ८५ हजार रुपयांचा गुटखा तयार करण्याचे साहित्य जप्त केले असून या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग पंढरपूर प्रशांत डगळे यांना माहिती मिळाली की तुषार रमेश आदमीले (रा. गोविंदपुरा ) हा राहते घरी मावा विक्री करत आहे .सदर ठिकाणी जाऊन आपण कारवाई करावी असे आदेशित केले. तेव्हा पोलीस कॉ. घायाळ यांनी घरामध्ये पाहणी केली.असता सदर ठिकाणी तुषार रमेश आदमीले (रा. गोविंदपुरा), शंकर विठ्ठल झेंड, वैभव ज्ञानेश्वर निकम (रा. अनिल नगर पंढरपूर) असे सुगंधी तंबाखू व कच्ची सुपारी यांचे मिश्रण करून मावा तयार करून विक्री करत असताना मिळून आले आहेत. तसेच त्यांच्याजवळ सुगंधी तंबाखू व कच्ची सुपारी,चुना असे मिळून आलेला आहे सदर ठिकाणी कच्ची सुपारी व सुगंधी तंबाखू मिश्रित तयार मावा ५६५ पुड्या किंमत ११ हजार ३००रु.
गोल्डन सुगंधी तंबाखू १०१ पुढे किंमत ५० हजार ५०९ रुपये. भगवा सुगंधी तंबाखू ४४ पुढे किंमत १५ हजार ४००रु.कच्ची सुपारी कत्री अंदाजे दहा किलो किंमत ७ हजार ५००7रू. पांढरा चुना ०३ किलो किंमत ३००रु. असे एकूण ८५ हजार रुपये किमतीचा मिळून आलेला मुद्देमाल मुद्देमाल व तीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post Views: 25