सांगोला – महाविद्यालय येथे वनस्पतीशास्त्र विभाग, सांगोला महाविद्यालय, डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला आणि कृषी विभाग, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कुंजीर, हादगा, कडवंची, माठ, चिगळ, घोळ, कुरडू, आघाडा, टाकळा, केनपट, चंदनबटवा, सराटा, पातर यासह विविध रानभाज्या त्यांच्या पाककृतींसह सादर करत त्यांची माहिती, त्यांचे पोषणमूल्य आणि आरोग्यविषयक महत्त्व यांची मांडणी केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव उपस्थित होत्या. यावेळी डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, डॉ.सिमा गायकवाड, प्रा.मारुती हाके, प्रा.शितल कवडे, प्रा.मिथिला नवले, प्रा.रोहित पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.राम पवार, रानभाजी पाककृतींचे परीक्षण डॉ.भाग्यश्री पाटील, डॉ.विद्या जाधव आणि डॉ.सोनल भुंजे यांनी केले.