पिलीव – माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील शेतकरी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा भगवान सुळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .यावेळी सचिव प्रदीप मदने यांनी संस्थेचा वार्षिक लेखाजोखा मांडला या पतसंस्थेचे एकुण 710 सभासद आहेत.या संस्थेची वार्षिक उलाढाल 23,98,77,936 एवढी असुन चालु आर्थिक वर्षांत संस्थेला 37,67,776 एवढा नफा झाला असुन दिपावलीसाठी सभासदांना यंदा 12 टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगीतले.या वार्षिक सर्वसाधारण सभेस संस्थेचे चेअरमन भजनदास चोरमले, व्हा. चेअरमन उत्तम सातपुते, संचालक शिवाजी मारकड सर, संतोष शेटे सर, शिवाजी कवळे, पोपट कोपनर, माजी सरपंच इस्लामखान पठाण, नईमखान पठाण,,संतोष कोपनर, प्रगतशील बागायतदार विलास धुलुगुडे, डाॅ.मोहन काकडे, भिमराव ढेरे, गौरीहर बोडरे, अरूण बोडरे, अजय झिंबल, संस्थेचे अनेक आजी ,माजी,संचालक, सभासद, ग्रामस्थ, संस्थेचे सचिव प्रदीप मदने, इतर सर्व कर्मचारी, यांच्यासह अनेक मान्यवर या सर्वसाधारण सभेस उपस्थित होते.यावेळी चेअरमन भजनदास चोरमले यांनी संस्थेने नेहमीच सभासदांचे, सर्व सामान्यांचे हित जोपासले असुन खरेतर अनेकांनी संस्थेच्या माध्यमातून मदत केली आहे .भविष्यात सुद्धा पतसंस्था मदत करण्यास कटिबद्ध असून सभासदांनी घेतलेले कर्ज वेळेत परतफेड करावी ,यापुढेही संस्था सर्वसामान्यांना उद्योग, व्यापार, शिक्षण यासाठी सहकार्य करीत सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम करीत राहील असे यावेळी बोलताना सांगीतले.सचिव प्रदीप मदने यांनी उपस्थांचे आभार मानले. फोटो _ चांदापुरी येथील शेतकरी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी मार्गदर्शन करताना चेअरमन भजनदास चोरमले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















