गुरुवार दि.२७/८/२६ रोजी नू.म.वि. शिशु शाळेमध्ये राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी समुद्राचा देखावा तयार केला होता .माननीय अर्चना कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा या सणाविषयी माहिती सांगितली तसेच उपस्थित पालकांना राखी बांधली. संगीत शिक्षिका अलका ओक यांनी राखी पौर्णिमेचे गीत सादर केले.नर्सरी मधील विद्यार्थ्यांनी कोळी बांधवांची वेशभूषा केली.रागेश्री गटातील विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर केले .राखी पौर्णिमा ही बहीण, भावाच्या प्रेमाचे प्रतीक असते आणि नारळ अर्पण करून समुद्राचे पूजन करतात यालाच राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा असे म्हणतात .यावेळी विद्यार्थ्यांनी नारळाचे विविध पदार्थ डब्यात आणायला सांगितले होते . विद्यार्थ्यांना राखी बांधून केले या कार्यक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन अर्चना कुलकर्णी यांनी केली.सांस्कृतिक प्रमुख अलका ओक ,मृणाल देशपांडे, सारिका कुलकर्णी ,स्नेहा गजेंद्रगडकर सर्व शिक्षका ,शिक्षकेतर वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ .कविता बडीगेर यांनी केले.
Post Views: 61