पंढरपूर – गेल्या अनेक वर्षापासून सर्वत्र सुरु असलेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे नैसर्गिक हानी होवून नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण देखील वाढत आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी येत्या काळात वृक्षलागवड आणि लावलेल्या वृक्षांची मनापासून जोपासना करणे काळाची गरज बनलेले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी येथील विठाई बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या वतीने पंढरपुरात शनिवारी (दि.२९) वृक्षप्रेमी नागरिकांना मोफत फळ आणि फुल झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
शहरातील प्रमुख असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात शनिवारी ( २९ आँगस्ट ) दुपारी पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत वृक्षप्रेमी नागरिकांना मोफत फळ व फुलांची रोपे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी पर्यावरण जागृती बाबत देखील माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून मोफत रोप घेऊन जावे व वृक्ष लागवड तसेच लावलेल्या वृक्षाचे मनापासून संवर्धन करावे असे देखील आवाहन विठाई संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 23