सोलापूरः क्रीडा दिनाच्या पूर्व संध्येला दी स्पोर्ट्स पॅव्हेलियनच्या वतीने हॅाकीचे ज्येष्ठ खेळाडू, क्रीडा संघटक जहांगीर शेख यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भुतडा उपाध्यक्ष एम शफी सदस्य नासिर आळंदकर ,यांच्या हस्ते करण्यात आला.
सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रात विविध स्वरूपात योगदान देणाऱ्या दी स्पोर्ट्स पॅव्हेलियनने क्रीडा दिवसाच्या पूर्व संध्येला सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रात निरपेक्ष पद्धतीने काम करणाऱ्या ज्येष्ठांना गौरविण्यात येते. गेली अनेक वर्षे हा उपक्रम राबविण्यात येतो.
यंदा श्री. शेख यांचा सत्कार करण्यात आला आहे. आंतर विद्यापीठ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शेख यांनी पश्चिम विभागीय विद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्यांची रेल्वेमध्ये नियुक्ती झाली. आंतर रेल्वे स्पर्धेत त्यांनी मध्य रेल्वेचे नऊ वर्ष प्रतिनिधित्व केले. राज्य हॅाकी संघटनेचे उपाध्यक्ष, जिल्हा संघटनेचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. विविध स्पर्धांचे आयोजन, निवड समितीमध्ये काम करत त्यांनी ठसा उमटवला. भारतीय हॅाकी फेडरेशनचे ते सदस्य आहेत.
या प्रसंगी नदीम शेख, मोहसिन शेख वसीम शेख आदी उपस्थित होते.
Post Views: 28